अभियंत्यांच्या बदल्यांमधील आर्थिक गैरव्यवहार उघड! अखेर मुख्यमंत्र्यांनी रोखल्या सर्व बदल्या, मंत्री कार्यालयातून बदल्यांसाठी दबाव

अभियंत्यांच्या बदल्यांमधील आर्थिक गैरव्यवहार उघड! अखेर मुख्यमंत्र्यांनी रोखल्या सर्व बदल्या, मंत्री कार्यालयातून बदल्यांसाठी दबाव

मंत्रालयातील बदल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ‘क्रीम’ खाती असलेल्या सार्वजनिक बांधकाम खाते, ग्राम विकास आणि पाणी पुरवठा विभागातल्या अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये प्रचंड प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची जोरदार चर्चा सध्या आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करीत सर्व बदल्यांची फाईल मागे ठेवल्याचे सांगण्यात येते.

सार्वजनिक बांधकाम खात्यातील 131 अभियंत्यांच्या बदलीचे आदेश मे महिन्यात काढण्यात आले. उर्वरित बदल्या जूनमध्ये अपेक्षित होत्या. मात्र, अद्याप तरी अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी बदल्यांची फाईल हातावेगळी केलेली नाही. प्रशासकीय आणि विनंती बदल्या रखडल्याने अभियंत्यांची घालमेल वाढली आहे. ग्रामविकास आणि पाणी पुरवठा खात्यातही हीच स्थिती आहे. बांधकाम विभागात तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या कार्यकारी पदावरील अभियंत्यांच्या बदल्या अपेक्षित असताना काहींची मुदतवाढीचा मागणी मान्य करण्यात आली.

सचिवांवर बदल्यांसाठी दबाव

अभियंत्यांच्या बदल्यांची फाईल मंजूर करावी म्हणून संबंधित विभागाच्या सचिवांना मंत्री कार्यालयातून सतत  पह्न जात आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या सक्त सूचनांमुळे सचिवांनी बदल्यांच्या फाईल प्रलंबित ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. बदल्या रोखून धरल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील राज्यभरातील जवळपास 170 अधिकारी  बदलीच्या प्रतीक्षेत असून सार्वजनिक बांधकाम विभागातील 10 ते 12  उपविभागीय अभियंत्यांचा  समावेश आहे.

पात्र अभियंत्यांवर अन्याय

बदलीसाठी पात्र असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई मंडळातील अनेक उपविभागीय अभियंत्यांवर अन्याय झाला आहे. काही उपविभागीय अभियंते तर जून महिन्यातच निवृत्त होत आहेत.

मंत्री कार्यालयातून ओएसडींची हकालपट्टी

मंत्रालयातील बदल्यांचे प्रकरण तापले असतानाच मुख्यमंत्री कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम मंत्री कार्यालयातील दोन तर राज्यमंत्री कार्यालयातील तीन ओएसडींना माघारी पाठवले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kitchen Cleaning Tips- किचनमधील लोखंडी तवा, कढईला गंज चढलाय का? करा हे उपाय कढई पुन्हा होईल नव्यासारखी Kitchen Cleaning Tips- किचनमधील लोखंडी तवा, कढईला गंज चढलाय का? करा हे उपाय कढई पुन्हा होईल नव्यासारखी
लोखंडी भांड्यात अन्न शिजवण्याचे महत्त्व हे खूप आहे. म्हणूनच आपल्यापैकी अनेकांच्या घरात, लोखंडी भांड्याचा वापर हा वाढलेला आहे. परंतु लोखंडी...
चंद्रपुरात सैराट झाले वाळू माफिया; जप्त केलेला हायवा नेला पळवून,गुन्हे दाखल
हिंदीसाठी बैठका घ्याव्या लागतात हा मराठीचा अपमान, संजय राऊत यांचा घणाघात
Dhaba Style Dal Fry – ढाब्यावरची खमंग डाळ फ्राय करा आता घरच्या घरी.. रेसिपी आणि सोबतीला उपयुक्त टिप्स
अच्छा सिला दिया तुने…प्रियकराच्या मदतीने 9 मुलांच्या आईने नवऱ्यालाच पाठवले यमसदनी अन् झाले दोघेही फरार..
इराण इस्रायलमध्ये शस्त्रसंधी, शेअर बाजाराने साधली ‘सुवर्ण’संधी; घोडदौडीला पुन्हा सुरुवात
वाहतूकमंत्री गडकरीच अडकले पुण्याच्या वाहतूककोंडीत