शिक्षणमंत्र्याच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांच्या हाती झाडू! बुलढाणा जिल्हय़ातील संतापजनक घटना

शिक्षणमंत्र्याच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांच्या हाती झाडू! बुलढाणा जिल्हय़ातील संतापजनक घटना

शिक्षण मंत्र्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्या विद्यार्थ्यांना कामाला जुंपल्याची संतापजनक घटना बुलढाणा जिल्हय़ात घडली! शिक्षण मंत्री येणार म्हणून विद्यार्थ्यांकडून शाळा झाडून घेण्यात आली, कचरा साफ करून घेण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत करण्यात आले येथे मात्र विद्यार्थ्यांच्या हाती झाडू देण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.

विदर्भातील शाळा सोमवार, 23 जून रोजी सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षणमंत्री दादा भुसे हे देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहाँ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देणार होते. शिक्षणमंत्री येणार म्हणून शाळा झाडून काढण्याच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना जुंपण्यात आले. शाळेचा सगळा आवार विद्यार्थ्यांकडून स्वच्छ करून घेण्यात आला. कचरा साफ करून घेण्यात आला. विद्यार्थी शाळा झाडत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा असावा अशी अपेक्षा असते, येथे मात्र विद्यार्थ्यांच्या उत्साहावर विरजण पडले.

शिक्षण विभागाची जबाबदारी

राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या भेटीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांकडून श्रम करून घेणे केवळ नियमबाह्यच नाही, तर मुलांवर मानसिक दबाव टाकणारे कृत्य आहे. यावर शिक्षण विभागाने त्वरित चौकशी सुरू करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना राबवून मग त्यांच्या हातात बिस्किटाचा पुडा द्यायचा ही नौटंकी महायुती सरकारच्या काळातच होऊ शकते. हे नाटक सरकारने बंद करावे. – अॅड. जयश्री शेळके, शिवसेना

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;