अमेरिकेचे लष्करी तळ उद्ध्वस्त, अवघ्या 36 तासांत इराणने घेतला बदला; कतार, इराक, सीरियातील एअरबेसवर क्षेपणास्त्रे डागली

अमेरिकेचे लष्करी तळ उद्ध्वस्त, अवघ्या 36 तासांत इराणने घेतला बदला; कतार, इराक, सीरियातील एअरबेसवर क्षेपणास्त्रे डागली

इस्रायलच्या बाजूने युद्धात उडी घेत इराणमधील अणुकेंद्रांवर हल्ले चढवणाऱया अमेरिकेला इराणने आज जबरदस्त दणका दिला. अवघ्या 36 तासांत इराणने बदला घेतला. इराणने कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठय़ा हवाई तळासह सीरिया आणि इराकमधील लष्करी तळांना लक्ष्य केले. तोफा आणि क्षेपणास्त्रांचा मारा करत हे तळ उद्ध्वस्त करून टाकले. इराणवरील हल्ल्यानंतर जिंकल्याच्या अविर्भावात असलेल्या अमेरिकेवर हा मोठा आघात आहे. आखातातील विविध देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ असून तेथे सुमारे 50 हजार सैनिक तैनात आहेत. इराणकडून इतर तळही लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे.

अमेरिकेने शनिवारी ’मिडनाइट हॅमर’ हे ऑपरेशन राबवत इराकमधील तीन अणुऊर्जा केंद्रांवर हवाई हल्ले केले होते. त्यानंतर इराणने या हल्ल्यांना जशास तसे आणि निर्णायक उत्तर देण्याची घोषणा केली होती. आखाती देशातील अमेरिकेचे लष्करी तळ इराणच्या रडारवर असतील असा अंदाज होता. तो खरा ठरला. इराणने सोमवारी ’ऑपरेशन बशारत अल् फतह’ (विजयाची नांदी) ची घोषणा करत आधी सीरियाच्या हसाकाह प्रांतातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला चढवला. त्यानंतर काही तासांतच इराणने कतारची राजधानी दोहा येथील अमेरिकी तळावर एका मागोमाग एक क्षेपणास्त्रs डागली. कतारने आपली हवाई हद्द वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर काही वेळेतच इराणने हा हल्ला केला.

युद्ध थांबवण्याची इस्रायलची ऑफर धुडकावली

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण कमालीचा आक्रमक झाल्याने परिस्थिती आणखी चिघळणार असे वाटत असतानाच इस्रायलने युद्ध थांबवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, इराणने इस्रायलची ही ऑफर धुडकावून लावली आहे. अजून युद्ध थांबवण्याची वेळ आलेली नाही. इस्रायल हा दुतोंडी देश आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे इराणने ठणकावले.

कतार भडकला! प्रतिहल्ल्याचा इशारा

इराणने दोहा येथील तळावर केलेल्या हल्ल्यामुळे कतार संतापला आहे. ‘आमच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने इराणच्या क्षेपणास्त्रे निष्प्रभ करून टाकल्याचा दावा कतारने केला आहे. मात्र, इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा आम्हाला कायदेशीर अधिकार आहे, असे कतारने म्हटले आहे. इराणने मात्र कतार आमचा चांगला शेजारी आणि मित्र आहे. अमेरिकी तळावरील हल्ल्यामुळे कतारला कुठलाही धोका नाही, असे म्हटले आहे.

जितके तुमचे बॉम्ब, तितकीच आमची क्षेपणास्त्रे

दोहातील हल्ल्याला इराणी लष्कराने दुजोरा दिला आहे. ‘इराणमधील अणुपेंद्रांवर हल्ला करताना अमेरिकेने जितके बॉम्ब टाकले, तितकेच आम्ही टाकले,’ असे इराणने म्हटले आहे. आमच्यावरील प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर मिळणार असेही इराणने ठणकावले आहे.

पुतीन यांचा इशारा, राणला अण्वस्त्रे देण्यास अनेक देश तयार

इराणला अण्वस्त्रे देण्यास अनेक देश तयार असल्याचे रशियाने नमूद केले आहे. आम्ही इराणी जनतेला सर्व प्रकारची मदत करण्यास कटिबद्ध आहोत, असे आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी सांगितले आणि अमेरिकेच्या हल्ल्याचा समाचार घेतला.

येमेनचाही इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला

अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर युद्धात उतरण्याची घोषणा करणाऱया येमेनने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला चढवला आहे. अमेरिकेने इराण-इस्रायल युद्धात भाग घेतल्यास लाल समुद्रातील अमेरिकी जहाजांवर हल्ला करण्याचा इशारा येमेनने आधीच दिला होता. त्यामुळे इस्रायलवरील क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर आता येमेनकडून अमेरिकी जहाजे लक्ष्य केली जाण्याची शक्यता आहे.

आखातातील 19 देशांमध्ये अमेरिकेचे तळ

जगातील प्रत्येक युद्धात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सहभागी असणाऱया अमेरिकेचे जगातील अनेक देशांत लष्करी तळ आहेत. आखातातील 19 देशांमध्ये अमेरिकेचे तळ आहेत. त्यापैकी सीरिया आणि कतारमधील तळ प्रमुख आहेत. हे दोन्ही तळ इराणने लक्ष्य केले. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, सीरियानंतर तुकाa, बहरीन, सौदी अरेबिया आणि जॉर्डनमधील तळांवर इराण हल्ला करण्याची शक्यता आहे.

बहरीनने बंद केली हवाई हद्द

सीरिया आणि कतारमधील हल्ल्यानंतर इराण-बहरीनमधील अमेरिकी तळांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर बहरीनमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी शांत राहावे व सुरक्षित स्थळी जावे असे आवाहन बहरीन सरकारने केले आहे. त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून हवाई हद्द तात्पुरती बंद केली आहे.

कडक दम, गॅम्बलर मिस्टर ट्रम्प, युद्ध तुम्ही सुरू केलेय पण शेवट आम्हीच करणार

अणुऊर्जा पेंद्रांवर हल्ले होऊनही मागे हटायला तयार नसलेल्या इराणने आता अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनाच इशारा दिला आहे. इराणी लष्कराचे प्रवत्ते इब्राहिम झुल्फकारी यांनी ट्रम्प यांना ‘गॅम्बलर’ म्हटले आहे. ‘इस्रायलच्या लष्करी कारवाईला पाठिंबा देऊन तुम्ही जुगार खेळला आहे. अमेरिकेने आता गंभीर परिणामांना तोंड द्यायला तयार राहावे. मिस्टर ट्रम्प ‘गॅम्बलर’, या युद्धाची सुरुवात भलेही तुम्ही केली असेल, पण याचा शेवट आम्ही करू,’ असे झुल्फाकारी यांनी ठणकावले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वाहतूकमंत्री गडकरीच अडकले पुण्याच्या वाहतूककोंडीत वाहतूकमंत्री गडकरीच अडकले पुण्याच्या वाहतूककोंडीत
देशभरात हायवे आणि उड्डाणपुलांचे जाळे विणणारे केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरीच पुण्यात वाहतूककोंडीमध्ये अडकले. गडकरी यांची गाडी पुढे जात...
दुर्घटना घडूनही पर्यटकांची हुल्लडबाजी सुरुच
पुण्यात पालखी सोहळ्यावेळी 5 लाख वारकरी मुक्कामी; पोलिसांकडून ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे पालखी मार्गावर माहिती संकलित
पुणे महापालिकेचे विभाजन हवेच! सर्वपक्षीय नेत्यांचा सूर
दशहरी, चौसा आंब्यांचा हंगाम बहरला
Monsoon Snacks – घाईच्या वेळी करा झटपट होणारे चविष्ट, कुरकुरीत पोह्यांचे पकोडे! चहासोबत किंवा इतर वेळी खाण्यासाठी सर्वात बेस्ट
न्यूझीलँडमध्ये आदिवासींकडून हिंदुस्थानविरोधात निदर्शने; ध्वजाचा अवमान, अराजक पसरण्याची शक्यता