वाहतूकमंत्री गडकरीच अडकले पुण्याच्या वाहतूककोंडीत

वाहतूकमंत्री गडकरीच अडकले पुण्याच्या वाहतूककोंडीत

देशभरात हायवे आणि उड्डाणपुलांचे जाळे विणणारे केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरीच पुण्यात वाहतूककोंडीमध्ये अडकले. गडकरी यांची गाडी पुढे जात नसल्याचे बघून पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला; पण पुण्यातील वाहतूककोंडी काही सुटली नाही. त्यामुळे मंत्री गडकरी यांना आपला पाहणी दौरा रद्द करावा लागला. गडकरी यांनी गाडीत बसूनच अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला.

शनिवारवाडा ते स्वारगेट हा भुयारी मार्ग व्हावा, यासाठी गडकरी यांचा पाहणी दौरा आज आयोजित करण्यात आला होता. नियोजित दौरा साडेदहा वाजता होता, त्यामुळे पोलिसांनी शनिवारवाड्याच्या मागील बाजूने वाहने टिळक पुलाकडे वळवून दिली होती, तसेच रस्तादेखील बंद केला होता. त्यामुळे सकाळच्या वेळेतच येथे वाहतूककोंडी झाली. मात्र, विमान उशिरा आल्याने गडकरी यांना पोहोचण्यास उशीर झाला. 11 वाजून 25 मिनिटांनी गडकरी शनिवारवाड्यावर पोहोचले. तेथे श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांनी प्रस्तावित भुयारी मार्ग पाहणीस सुरुवात केली. तोपर्यंत दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. गडकरींची गाडी कोंडीमध्ये अडकली. पोलीस रस्ता करून देण्याचा प्रयत्न करीत होते. वाहनचालकांनीदेखील हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली. वाहतूककोंडी लक्षात घेता, नितीन गडकरी यांनी त्यांच्या ड्रायव्हरला गाडी मागे घेण्यास सांगितले.

शेवटी गडकरींनी दौरा रद्द केला. गाडीत बसलेले आमदार हेमंत रासने खाली उतरले. वाहतूककोंडीमुळे दौरा रद्द करण्यात आला आहे. गडकरी यांनी, ‘आपण पुन्हा आल्यावर पाहणी करू,’ असे आश्वासन दिल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. गडकरी यांच्यामुळे पुन्हा पुण्यातील वाहतूककोंडी राज्यात चर्चेत आहे. शनिवारवाडा परिसराबरोबरच बाजीराव रोडदेखील काही वेळ वाहतुकीसाठी बंद केला होता. तरीदेखील वाहतूककोंडी झाली. रासने मात्र पोलीस आणि पालिका प्रशासनात समन्वय न झाल्यामुळे ही वाहतूककोंडी झाल्याचे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;