‘डमीं’ना आवरण्यासाठी एमपीएससी परीक्षार्थींना केवायसी सक्तीची

‘डमीं’ना आवरण्यासाठी एमपीएससी परीक्षार्थींना केवायसी सक्तीची

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षा आणि भरती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना केवायसी प्रक्रियेची सक्ती करण्यात आली आहे. आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परीक्षा देणारा उमेदवार खरा आहे की डमी याची खात्री पटवण्यासाठी एमपीएससीने हे पाऊल उचलले आहे. एमपीएससीकडून ही माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांना आधार ऑनलाइन ई-केवायसी, आधार ऑफलाइन पेपरलेस डिजिटल केवायसी, आधार ऑफलाइन पेपर आधारित केवायसी, नॉन-आधार ऑफलाइन केवायसी अशा चार पद्धतींनी केवायसी करता येणार आहे. एमपीएससीने मार्च 2017 पासून ऑनलाइन प्रणालीत आधार क्रमांक नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एकदाच नोंदणी करताना उमेदवाराने आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी त्या प्रणालीत नोंदवणेही आवश्यक असून उमेदवाराने आधार आधारित पडताळणी निवडली तर आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;