350 कोटी गमावल्यानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टीला आली जाग! घेतला महत्त्वाचा निर्णय, वाचा

350 कोटी गमावल्यानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टीला आली जाग! घेतला महत्त्वाचा निर्णय, वाचा

बाॅलिवूडमधील हिट दिग्दर्शकांमध्ये रोहित शेट्टी हे एक नाव प्रामुख्याने घेतले जाते. परंतु रोहित शेट्टी म्हणजे अॅक्शन फिल्म असे समीकरण जुळले होते. अ‍ॅक्शनसह विनोदी चित्रपटांवर रोहित शेट्टीची मजबूत पकड आहे. पण अजय देवगणसोबत 350 कोटींचा ‘सिंघम अगेन’ फ्लॉप झाल्यानंतर, आता रोहित शेट्टी अ‍ॅक्शन चित्रपटांपासून ब्रेक घेताना दिसत आहे. हा चित्रपट फ्लाॅप झाल्यानंतर, रोहितने कानाला खडा लावला आहे. सध्या रोहित अॅक्शन चित्रपटापासून जरा दूरच राहिलेला दिसत आहे.

बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहून चित्रपट हिट किंवा फ्लॉप मानले जातात. बऱ्याचदा मोठ्या बजेटच्या चित्रपटांसाठी सर्वात मोठे काम म्हणजे चित्रपट चालणे. चित्रपट चालण्यासाठी सर्व भट्टी जमून येणं हे खूप गरजेचं आहे. नुकताच रोहित शेट्टीने केलेल्या चित्रपट ‘सिंघम अगेन’ सोबतही असेच काहीसे घडले आहे. या चित्रपटाने काहीच कमाल न दाखवल्यामुळे राेहित शेट्टी अक्षरशः कर्जबाजारी झालेला आहे.

अ‍ॅक्शन चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या रोहितने ‘सिंघम अगेन’साठी 350 कोटी रुपये खर्च केले होते. पण दुर्दैवाने ‘सिंघम अगेन’ फ्लॉप झाल्यावर रोहितने तेव्हाच ठरवले होते की, पुढच्या चित्रपटात अजय देवगणसोबत अ‍ॅक्शनवर आधारित चित्रपट बनवणार नाही. त्याने स्वतः एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, सध्या अ‍ॅक्शन चित्रपटांवर लक्ष केंद्रित करणार नाही. त्यामुळेच आता रोहित शेट्टी आणि अजय देवगण या दोघांनीही कॉमेडी चित्रपटावर लक्ष केंद्रित केले आहे.

अलिकडेच बातमी आली आहे की, रोहित आणि अजय ‘गोलमाल 5’ साठी एकत्र येत आहेत. सध्या ‘गोलमाल 5’ वर काम सुरू झाले आहे. चित्रपटाची कथाही सप्टेंबर 2025 पर्यंत लिहून पूर्ण होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;