ठाण्यातील बेशिस्त रिक्षाचालकांना एक कोटींचा दंड; अवघ्या 16 दिवसांत दंडवसुली, वाहतूक विभागाची कारवाई

ठाण्यातील बेशिस्त रिक्षाचालकांना एक कोटींचा दंड; अवघ्या 16 दिवसांत दंडवसुली, वाहतूक विभागाची कारवाई

ठाणे शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेशिस्तपणे रिक्षाचालकांविरोधात ठाणे वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणाऱ्या रिक्षाचालकांकडून 16 दिवसांत तब्बल 1 कोटी 14 लाख 76 हजारांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान 7 हजार 252 रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने वाहतूक विभागाने ठाण्यातील रिक्षाचालकांच्या बेशिस्तीला ‘ब्रेक’ लावला आहे.

बॅच नाही, योग्य गणवेश नाही, जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धट वागणे, वाहतुकीचे नियम न पाळणे अशा विविध कारनाम्याने ठाणे वाहतूक विभाग हद्दीतील रिक्षाचालक प्रसिद्ध आहेत. रिक्षाचालकांविरोधात नागरिकांच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. त्यानुसार ठाणे वाहतूक विभागाने शहरातील बेशिस्त व मुजोर रिक्षाचालकांना वटणीवर आणण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. सकाळी नऊ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत रिक्षाचालकांची झाडाझडती घेण्यात येत आहे. यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने अशा रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 1 ते 16 जूनदरम्यान रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 9 लाख 39 हजार वसुली केली आहे तर 1 कोटी 11 लाखांची वसुली बाकी असल्याची माहिती वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

डोंबिवलीत 49 लाखांची वसुली

डोंबिवली शहरातही गेल्या पाच महिन्यांत 5 हजार 15 रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 49 लाख 97 हजार 150 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती डोंबिवली शहर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी दिली.

भिवंडीत रिक्षाचालक संतप्त

भिवंडीत वाहतूक पोलिसांकडून शहरातील रिक्षाचालकांवर दंड आकारणी केली जात असल्याने रिक्षाचालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांनी भिवंडी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शरद ओहोळ यांच्या कार्यालयाबाहेर संतप्त निदर्शने केली. जे रिक्षाचालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत त्यांच्यावर करावी व्हावी. मात्र अन्यायकारक वसुली करू नये, अशी मागणी संघटनेने केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;