RCB च्या विजयोत्सवाला गालबोट, चिन्नास्वामी स्टेडियमवर चेंगराचेंगरी, चौघांचा मृत्यू
आयपीएल 18 चे विजेतपद जिंकल्यानंतर रॉयल चॅलेजर्स ऑफ बंगळुरूसाठी कर्नाटक सरकारने सत्कार सोहळ्याचे आयोजन चिन्नास्वामी स्टेडियमवर केले होते. या स्टेडियममध्ये RCB च्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी चेंगराचेंगरी झाल्याचे देखील वृत्त असून त्यात एका लहान मुलासह दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या दुर्घटनेत तीन
VIDEO | Child faints outside Bengaluru’s Chinnaswamy Stadium as a massive crowd gathers to celebrate Royal Challengers Bengaluru’s IPL 2025 victory.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7)’ pic.twitter.com/vtZEGr2f7S
— Press Trust of India (@PTI_News) June 4, 2025
चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने RCB च्या खेळाडूंचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी आपल्या आवडत्या खेळाडूंची एक झलक मिळवण्यासाठी हजारो चाहते स्टेडियम बाहेर उपस्थित होते. यावेळी स्टेडियममध्ये घुसण्यासाठी चाहते झाडांवर, भिंतींवर चढत होते. त्यावेळी गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केला. दरम्यान यावेळी झालेल्या चेगंराचेंगरीत चार जणांचा मृत्यू झाल्याच समजते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List