Uttarakhand News – केदारनाथ यात्रेतील काही भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी तर एक बेपत्ता

Uttarakhand News – केदारनाथ यात्रेतील काही भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी तर एक बेपत्ता

उत्तराखंडमध्ये केदारनाथ यात्रेला जाणाऱ्या काही भाविकांचा अपघात झाला. काही भाविक बुधवारी जंगलचट्टी येथील पोल क्रमांक 153 जवळील डोंगरावरून दरीत पडले. यात दोन भाविकांचा मृत्यू झाला तर, तीनजण जखमी झाले आहेत. एक भाविक बेपत्ता आहे. या घटनेची माहिती मिळताच DDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

ही घटना आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. केदारनाथ यात्रेवर असलेले काही भाविक हे जंगल चट्टी येथे पोल नंबर 153 जवळ दरीत कोसळले. यानंतर DDRF ने बचावकार्य सुरू केले. आता पर्यंत DDRF ने दोघांचे मृतदेह आणि एका जखमी भाविकाला बाहेर काढले आहे. जखमी भाविकाला गौरीकुंड येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. आणखी एका जखमीसाठी आणि बेपत्ता व्यक्तीच्या शोधासाठी बचाव पथक दरीत उतरले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;