पावसाळ्यात निसर्गाच्या कुशीतला स्वर्ग पाहण्यासाठी, चेरापुंजीला भेट द्यायलाच हवी!

पावसाळ्यात निसर्गाच्या कुशीतला स्वर्ग पाहण्यासाठी, चेरापुंजीला भेट द्यायलाच हवी!

पावसाळ्यात मेघालयाचं सौंदर्य अधिकच बहरतं. पावसाळ्यात चेरापूंजी हे हिरवळीने नटलेलं पाहायला मिळतं. जागोजागी धबधब्यांनी सजलेलं आणि ढगांनी वेढलेलं ठिकाण आहे. तिथे गेल्यावर असं वाटतं की आपण एखाद्या वेगळ्याच सुंदर जगात आलो आहोत. चेरापुंजी निसर्गप्रेमींसाठी हे एक परिपूर्ण ठिकाण आहे. शकते. पावसाने भिजलेले डोंगर, हिरवळ, कोसळणारे धबधबे असं चेरापुंजीचे दृश्य असते. एखाद्या चित्रातून बाहेर पडून वास्तवात आल्यासारखे वाटते. हे ठिकाण केवळ निसर्गप्रेमींसाठी खास नाही तर शांती, आराम आणि साहस एकत्र शोधू इच्छिणाऱ्यांसाठी देखील आदर्श आहे.

चेरापुंजीची खास गोष्ट म्हणजे हे ठिकाण खूपच सुंदर आणि निसर्गाने समृद्ध असलेले आहे. जगात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे. तरीही, पावसाशिवायही इथे खूप काही खास आहे. मेघालयची राजधानी शिलाँगपासून फक्त 2-3 तासांच्या अंतरावर असलेले हे छोटे हिल स्टेशन अजूनही त्याचा पारंपरिक, नैसर्गिक सौंदर्य टिकवून आहे. येथे झाडांच्या मुळांनी तयार केलेला पूल, उंच धबधबा, गुहा आणि स्वच्छ निळी नदी अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात.

चेरापुंजीत काय खास आहे?

लिविंग रूट पूल: झाडांच्या मुळांनी तयार केलेला नैसर्गिक पूल आहे. खासी जमातीचे लोक पिढ्यानपिढ्या हे पूल बनवत आले आहेत. हे पाहायला खूप सुंदर आणि वेगळं वाटतं.

नोहकालिकाई धबधबा: हा हिंदुस्थानातील सर्वात उंच धबधबा आहे. खूप उंचावरून पाणी खाली पडताना पाहणे हे खूप आनंद देणारे असते. यामागे एक गूढ आणि भावनिक कथा आहे.

मावस्माई और अरवाह लेणी : या गुहा चुनखडीच्या खडकांपासून नैसर्गिकरित्या तयार झालेल्या आहेत. आतमध्ये जायचं तर थोडं साहस लागतं, पण आतली रचना खूपच सुंदर आहे.

डावकी नदी: ही नदी इतकी स्वच्छ आहे की त्यात चाललेली बोट पाण्यावर नव्हे तर हवेत तरंगतेय असे वाटते. इथे बोटिंग करण्याचा खूपच छान अनुभव असतो.

चेरापुंजीला कसे जायचे?

सर्वप्रथम शिलाँगला जावे लागते. शिलाँगहून टॅक्सी किंवा बसने चेरापुंजी 2 ते 3 तासांत पोहोचता येते. प्रवासादरम्यान डोंगर, ढग, हिरवळ आणि दऱ्या दिसतात, जे मन मोहून टाकतात.

चेरापुंजीला जाण्याची योग्य वेळ कोणती?

खरंतर चेरापूंजी वर्षभर सुंदर असते, पण जून ते सप्टेंबर म्हणजे पावसाळ्यात हे ठिकाण अजूनच सुंदर दिसते. मात्र, पावसामुळे काही रस्ते ओले आणि निसरडे होऊ शकतात, त्यामुळे थोडी काळजी घेणे गरजेचे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;