म्हणे विश्वगुरू! पंतप्रधान मोदींना जी-7 शिखर संमेलनात मागच्या रांगेत उभं केलं

म्हणे विश्वगुरू! पंतप्रधान मोदींना जी-7 शिखर संमेलनात मागच्या रांगेत उभं केलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कॅनडामध्ये आहेत. कॅनडामध्ये आयोजित जी-7 शिखर संमेलनामध्ये ते सहभागी झाले. सुरुवातीला त्यांना या संमेलनाचे आमंत्रण देण्यात आले नव्हते, मात्र नंतर कॅनडाने समंजसपणाची भूमिका घेतली आणि पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले. त्यानुसार, मोदी या शिखर संमेलनाला पोहोचले, मात्र जगभरातील प्रमुख देशांच्या गर्दीत त्यांना मागच्या रांगेत उभे करण्यात आले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मोदी विश्वगुरू बनले असा डंका पिटणाऱ्यांची गोची झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)


पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात गेले की त्यांच्या आजूबाजूला हिंदुस्थानी वंशाचे लोक जमतात, झेंडे फडकवतात, घोषणाबाजी करतात असे व्हिडीओ भाजपकडून अनेकदा शेअर केले जातात. मात्र यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो हे नुकतेच उघड झाले होते. तसेच रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना हिंदुस्थानी नागरिक, विद्यार्थ्यांना तिथून बाहेर पडण्यासाठी युद्ध थांबवण्यात आल्याच्या पोस्टही करण्यात आल्या. ‘पापा ने वॉर रुकवा दी’ अशा आशयाच्या या पोस्टची विरोधकांनीही चिरफाड केली होती.

नुकत्याच झालेल्या हिंदुस्थान-पाकिस्तानमधील छोटेखानी युद्धावेळी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर युद्धविराम जाहीर केला. त्यामुळे मोदींची गोची झाली. भक्तांनी दिलेल्या विश्वगुरू या पदवीला तडा जाणाऱ्याच या गोष्टी असल्याची चर्चा सोशल मीडियावर झाली. आता तर जी-7 शिखर संमेलनावेळी त्यांना मागच्या रांगेत उभे करण्यात आल्याचे समोर आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;