पनवेलचा देवद पूल ‘कुंडमळा’च्या वाटेवर, 11 कोटी खर्चुन बांधलेल्या पुलाचे उद्घाटनच नाही

पनवेलचा देवद पूल ‘कुंडमळा’च्या वाटेवर, 11 कोटी खर्चुन बांधलेल्या पुलाचे उद्घाटनच नाही

पनवेलच्या गाढी नदीवर 11 कोटी रुपये खर्चुन सिडकोने नवीन पूल उभारला आहे. परंतु या पुलाच्या उद्घाटनासाठी प्रशासनाला मुहूर्तच मिळत नसल्याने हा नवाकोरा पूल वापराविना पडून आहे. त्यामुळे देवद परिसरातील हजारो वाहनचालकांना नाईलाजाने या पुलाच्या बाजूला असलेल्या जुन्या पाइपलाइन पुलावरून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे याठिकाणी ‘कुंडमळा’ दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.

नवीन पनवेल परिसराला लागूनच देवद हे गाव आहे. या भागाचा गेल्या काही वर्षांत वेगाने विकास झाला असून येथे जवळपास 9 हजार नागरिक वास्तव्यास आहेत. तसेच सनातन संस्थेचे आश्रम याठिकाणी असून देशभरातील अनेक मोठी मंडळी येत असतात. त्यामुळे या भागात नवीन पूल बांधावा, अशी मागणी देवद ग्रामस्थ तसेच हिंदू जनजागृती समितीचे शिवाजी वटकर यांनी केली होती. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत निवेदन दिल्यानंतर गाढी नदीवर 11 कोटी रुपये खर्च करून सिडकोने नवीन पूल बांधला. परंतु आजतागायत या पुलाचे उद्घाटन करण्यात आलेले नाही.

दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

नवीन पूल बांधला असताना तो वाहतुकीसाठी बंद असल्याने नाईलाजाने वाहनचालकांना जुन्या पाइपलाइन पुलावरून ये-जा करावी लागत आहे. सरकार आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल परिसरातील नागरिकांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;