13 षटकार, 48 चेंडूत शतक; मॅक्सीची तोडफोड खेळी, रोहित शर्माच्या बरोबरीसह ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेव फलंदाज
ऑस्ट्रेलिया स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल तोडफोड फलंदाजीसाठी ओळखला जातो. अनेकदा त्याने मोक्याच्या क्षणी विस्फोटक फलंदाजी करत संघाला अशक्यप्राय विजय मिळवून दिलेले आहेत. 2023 मध्ये हिंदुस्थानमध्ये झालेल्या विश्वचषकात त्याने अफगाणिस्तानविरुद्ध जायबंदी असतानाही नाबाद द्विशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला होता. अर्थात आता त्याने वन डे क्रिकेटला रामराम ठोकला आहे. याच महिन्याच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याने निवृत्तीची घोषणा केली. वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी टी-20 क्रिकेटमध्ये तो सक्रिय असून त्याच्या बॅटमधून धावांची बरसातही होत नाही. अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर लीग क्रिकेट 2025 मध्येही त्याने अशीच एक दमदार खेळी करत विक्रमांचे इमले रचले आहेत.
मेजर लीग क्रिकेट 2025 ग्लेन मॅक्सवेल वॉशिंग्टन फ्रीडम संघाचे नेतृत्व करतो. मंगळवारी वॉशिंग्टन फ्रीडमचा सामना लॉस एंजेलिस रायडर्सशी झाला. या लढतीत ‘मॅक्सी’ नावाचे वादळ घोंघावले. चौफेर फटकेबाजी करत मॅक्सवेलने अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकले. या खेळी दरम्यान त्याने 13 उत्तुंग षटकार ठोकले. मॅक्सवेलचे टी-20 कारकिर्दीतील हे आठवे शतक आहे. या लढतीत मॅक्सवेलने 49 चेंडूंचा सामना केला आणि नाबाद 106 धावा केल्या. 216.33 च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा करत चाहत्यांना जल्लोषाची संधी दिली.
An insane Glenn Maxwell hundred in the MLC!
He went from 11 off 15 … to 106 off 49!
Full highlights coming in just minutes
pic.twitter.com/zwcpjnyAls
— 7Cricket (@7Cricket) June 18, 2025
– टी20 मध्ये सर्वाधिक 22 शतक ख्रिस गेल याच्या नावावर आहे. त्यानंतर बाबर आझम 11, रिली रोसॉव 9, विराट कोहली 9 यांचा नंबर लागतो. मायकल क्लिंगर, एरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर, जोस बटलर, रोहित शर्मा यांनी प्रत्येकी 8 शतक ठोकले असून या पंक्तीत आता मॅक्सवेलची एन्ट्री झाले आहे. त्याने रोहित शर्मासह बटलर, वॉर्नर, फिंच याचीही बरोबरी केली आहे.
अशी कामगिरी करणारा एकमेव फलंदाज
टी-20 क्रिकेटमध्ये मॅक्सवेलने 10,500 धावांचा टप्पा पार केला आहे. त्याने टी-20 मध्ये 178 विकेट्सही घेतलेल्या आहेत. टी-20 मध्ये 10500 धावा, 170 हून अधिक विकेट्स आणि पाचहून अधिक शतक ठोकणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.
सहाव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा
टी-20 क्रिकेटमध्ये सहा किंवा त्याहून खाली फलंदाजीला येऊन सर्वाधिक धावा करणाऱ्यातही मॅक्सवेल उजवा ठरला आहे. याआधी कोरी अँडरसन याने नाबाद 59 धावांची खेळी केली होती. हा विक्रमही आता नाबाद 106 धावांवसह मॅक्सवेलच्या नावावर जमा झाला आहे.
कसोटी मालिकेत हिंदुस्थानचीच सरशी! माजी धडाकेबाज फलंदाज मॅथ्यू हेडनचे भाकीत
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List