Crime News – मॅट्रिमोनियल साइटवरून दोस्ती, पहिल्याच भेटीत सेक्स अन् धोका; तरुणीची 65 लाखांची फसवणूक

Crime News – मॅट्रिमोनियल साइटवरून दोस्ती, पहिल्याच भेटीत सेक्स अन् धोका; तरुणीची 65 लाखांची फसवणूक

देशात महिलांची फसवणूक करून त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. रोज नवीन प्रकार समोर येऊनही महिलांच्या सुरक्षेबाबत सरकारने मौन बाळगले आहे. असे असताना आता पुन्हा एकदा राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएडातील सेक्टर-58 पोलीस स्टेशन परिसरात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार आणि 65 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला मूळची भोपाळची आहे. ती नोएडा येथील एका आयटी कंपनीत काम करते. पीडित महिला आरोपीला ‘Jeevansathi.com’ या मॅट्रिमोनियल साइटद्वारे भेटली. सुरुवातीला त्यांच्यात गप्पा झाल्या आणि यानंतर दोघांची पहिली भेट 11 ऑगस्ट 2024 रोजी नोएडा येथील सेक्टर-56 येथील एका हॉटेलमध्ये झाली. जिथे दोघांनी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर नोएडामधील सेक्टर-18 येथील एका पार्टीत आरोपीने तिला लग्न करण्याचे आश्वासन दिले आणि यानंतर दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहू लागले.

सोशल मीडियावरून सुरू होते सेक्स रॅकेट, चार तरुणींची केली सुटका

पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने स्वतःला एका बांधकाम कंपनीचा मालक म्हणून ओळख करून दिली आणि तिला नोकरी सोडण्यास सांगितले. पीडिता त्याच्या जाळ्यात अडकली आणि 22 ऑक्टोबर 2024 रोजी तिने नोकरी सोडली. आरोपी तिच्याशी गोड गोड बोलून तिला आणखी तिच्या जाळ्यात ओढत होता. यादरम्यान आरोपीने पीडितेच्या मोबाईलचा पासवर्ड मिळवला. आणि तिच्या खात्यातून 25 लाख रुपये स्वत:ला ट्रान्सफर केले. यासोबतच त्याने तिच्या नावाने 20 ते 25 फिनटेक अॅप्सद्वारे 40 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले. आणि 16 मार्च 2025 रोजी तो जयपूरला जात असल्याचे सांगून गायब झाला.

पोलीस डायरी – महिलांच्या सुपाऱ्या वाढल्या !

अचानक आरोपी गायब झाल्यानंतर पीडितेने त्याच्याबद्दल चौकशी केली. तेव्हा तो आधीच विवाहित असल्याचे उघड झाले. यानंतर तिने लगेचच पोलिसात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी नोएडाच्या सेक्टर-58 पोलीस ठाण्यात बलात्कार, फसवणूक आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल. हे प्रकरण मॅट्रिमोनियल साइट्सचा गैरवापर आणि सायबर फसवणुकीचे एक गंभीर उदाहरण आहे, असे एडीसीपी सुमित शुक्ला म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

संगमेश्वरामध्ये घरात घुसला 8 फुटांचा अजगर, सर्पमित्रांकडून जीवदान संगमेश्वरामध्ये घरात घुसला 8 फुटांचा अजगर, सर्पमित्रांकडून जीवदान
पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की कोकणातल्या घरात साप घुसतात. असाच एका घरात साप नव्हे तर चक्क अजगर घुसला होता, तोही...
शिर्डीत पादचाऱ्याचे अपहरण करून खून; शिर्डीतील अल्पवयीन मुलांचे कृत्य
‘काशीकाकांनी आईसमोरच वडिलांना मारून टाकलं’, मुलाच्या जबानीनंतर महिलेला अटक; मुलगा झाला पोरका
G7 परिषदेत पंतप्रधान मोदी-मेलोनी भेट, इटलीच्या PM ने शेअर केला फोटो
मणिपुरात माणुसकीचं दर्शन; एअर इंडिया विमान अपघातात मृत्यू पावलेल्या दोन लेकींसाठी संघर्ष ठेवला बाजूला
सरेंडर करणार नाही! हल्ला केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील; इराणचा अमेरिकेला गंभीर इशारा
Milk Rice Benefits- दररोज रात्री दूध भात खाल्ल्याने आरोग्यासाठी ‘5’ जबरदस्त फायदे होतील, वाचा