Fastag News – नितीन गडकरींची मोठी घोषणा, 3000 रुपयांत मिळणार वर्षभराचा फास्टॅग रिचार्ज!

Fastag News – नितीन गडकरींची मोठी घोषणा, 3000 रुपयांत मिळणार वर्षभराचा फास्टॅग रिचार्ज!

देशात राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी मोठी घोषणा केली. खासगी वाहनांसाठी केंद्र सरकार आता FASTAG वर आधारित एक वार्षिक पास सुविधा आणणार आहे. याची किंमत सुमारे 3 हजार रुपये असेल. ही वार्षिक पास सुविधा 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे. या पासमुळे खासगी वाहन चालकांना कमीत कमी खर्चात आणि सुखकर प्रवास करता येणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीटरवर म्हणजेच X अकाऊंटर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. वार्षिक पास ही नवीव सुविधा विशेषतः गैर-व्यावसायिक वाहनांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवास सुरळीत होईल. लवकरच या पाससाठी NHAI आणि MoRTH च्या वेबसाइटवर आणि ‘राजस्थान यात्रा अॅप’ वर एक वेगळी लिंक उपलब्ध करून दिली जाईल. ज्याद्वारे वाहन मालक पास मिळवू शकतील, असे गडकरी यांनी सांगितले आहे.

 

नवीन पास प्रणालीचा काय फायदा होईल?

नवीन वार्षिक पास धोरणाचे उद्दिष्ट 60 किमीच्या परिसरात असलेल्या टोल प्लाझांशी संबंधित जुन्या समस्या सोडवणे आहे. एकाच डिजिटल व्यवहाराद्वारे टोल भरणे सोपे करणे, टोल प्लाझावरील वेळ कमी करणे, गर्दी कमी करणे आणि वाद टाळणे हे त्याचे प्रमुख फायदे आहेत. या घोषणेमुळे लाखो खासगी वाहन चालकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे त्यांचा प्रवास जलद होईल.

लवकरच देशातले टोलनाके हटणार

काही दिवसांत संपूर्ण देशभरातील सर्व टोल प्लाझा हटवले जातील, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केली होती. नवीन यंत्रणा लागू झाल्यानंतर सॅटेलाईट ट्रॅकिंगनुसार आपोआप टोल कापला जाईल. सॅटेलाईट ट्रॅकिंगच्या माध्यमातून गाडीच्या क्रमांकाची ओळख पटवली जाईल, त्यानंतर हा टोल आपोआप कट होईल, असे गडकरी म्हणाले.

लवकरच देशातले टोलनाके हटणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;