Crime News – चोरीच्या आरोपांवरून मनोरुग्णाची निर्घृण हत्या, नदीकाठी पुरला मृतदेह

Crime News – चोरीच्या आरोपांवरून मनोरुग्णाची निर्घृण हत्या, नदीकाठी पुरला मृतदेह

मणिपूरच्या इम्फाळमधून एक 34 वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची बातमी होती. चेसम अब्दुल कादिर असे या व्यक्तीचे नाव होते. आता या बेपत्ता झालेल्या चेसम अब्दुल कादिरची हत्या झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गेल्या आठवड्यात बेपत्ता झालेला चेसम अब्दुल कादिर मानसिक रुग्ण असल्याचे समजते. दरम्यान, मंगळवारी पोलिसांनी नदीकाठावरून त्याचा कुजलेला मृतदेह बाहेर काढला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हत्येत सामील असलेल्या आरोपींना शोधून शिक्षा व्हावी यासाठी लोक निदर्शने करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार कादिर 11 जूनपासून बेपत्ता होता. कादिरवर चोरीच्या संशयावरून हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीही त्याच्यावर चोरीचा आळ टाकण्यात आला होता. तेव्हा त्याच्या कुटुंबाने चोरीच्या आरोपांना दुजोरा दिला नाही. कादिर मानसिक रुग्ण होता. याबाबत केंद्र सरकारच्या युनिक डिसॅबिलिटी आयडी (यूडीआयडी) आणि मणिपूर समाज कल्याण विभागाकडे नोंदणी आहे. कादिरला 65 टक्के मानसिकदृष्ट्या अपंग म्हणून प्रमाणित केले आहे, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.

कादिर स्पष्टपणे बोलूही शकत नव्हता. त्यामुळे तो कुटुंबातील व्यक्तींशिवाय क्वचितच कोणाशीही बोलायचा असे कादिरचा भाऊ मोहम्मद फारूक चेसम म्हणाला. “10 जूनच्या रात्री तो घरातून निघून गेला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो रात्री उशिरा रसत्यावरून जाताना दिसला. यानंतर त्याच्यावर सुमारे ३ किमी अंतरावर हल्ला करण्यात आला आणि त्याला अरंबाई टेंगोल युनिट-23 च्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती आम्हाली मिळाली असे फारूक म्हणाला.

दरम्यान 11 जून रोजी वांगोई पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता कादिर बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तब्बल 7 दिवसांनंतर 17 जून रोजी पोलिसांनी नंबुल नदीजवळ एका मृतदेह पुरल्याची माहिती मिळाली. यानंतर कुटुंबाला कादिरच्या मृत्यूची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान कार्यकारी दंडाधिकारी, फॉरेन्सिक तज्ञ आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेनंतर, या प्रकरणावर संयुक्त कृती समिती (JAC) स्थापन करण्यात आली. या प्रकरणाशी संबंधित आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे.

कादिरच्या कुटुंबियांना त्याच्या हत्येचा मोठा धक्का बसला आहे. “आम्हाला न्याय हवा आहे. चोरीच्या आरोपाखाली मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या माणसाला अशा प्रकारे कसे मारले जाऊ शकते आणि पुरले जाऊ शकते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच आरोपिंना लवकरात लवकर शोधण्याचे आवाहनही त्यांनी पोलिसांना केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;