नाम नरेंदर, काम सरेंडर! ट्रम्प यांचा एक फोन येताच ‘जी हुजूर’ करत मोदी शरण गेले; राहुल गांधी यांचा जोरदार निशाणा

नाम नरेंदर, काम सरेंडर! ट्रम्प यांचा एक फोन येताच ‘जी हुजूर’ करत मोदी शरण गेले; राहुल गांधी यांचा जोरदार निशाणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तिकडून फोन आला आणि ‘जी हुजूर’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना शरण गेले, असे सांगत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पाकिस्तानसोबतच्या शस्त्रसंधीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला.

भोपाळ दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी कॉँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेदरम्यान भारताने अचानक केलेल्या शस्त्रसंधीच्या घोषणेवरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. राहुल गांधी म्हणाले, तिकडून ट्रम्पने एक फोन केला आणि म्हटले, मोदीजी काय करताय? त्यावर ‘जी हुजूर’ करत नरेंदर सरेंडर झाले आणि ट्रम्प यांच्या इशाऱ्याचे पालन केले.

  • देशाची संपूर्ण संपत्ती काही निवडक लोकांच्या हाती सोपवली जात आहे. सर्वत्र फक्त दोन-तीन लोकच दिसतात, जणू काही त्यांच्याशिवाय देशात दुसरे कोणतेही उद्योगपती नाहीत. देशातील 90 टक्के लोकांकडे दुर्लक्ष करून सर्व पैसा काही निवडक लोकांच्या हाती सोपवला जात आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

कॉँग्रेस महासत्तांशी लढते

इंदिरा गांधी यांनी 1971 च्या युद्धावेळी अमेरिकेच्या धमक्यांना न जुमानता पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. कॉँग्रेसचे लोक हे सरेंडर होणारे नाहीत, तर महासत्तांशी लढणारे आहेत. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल हे महासत्तांशी लढणारे होते, असे राहुल गांधी म्हणाले.

भाजप, आरएसएस पळपुटे

भाजप, आरएसएसच्या लोकांना मी चांगलाच ओळखतो. त्यांच्यावर थोडासा जरी दबाव टाका, थोडासा धक्का मारा, ते घाबरून पळून जातात. सरेंडर होणे हा यांचा इतिहास आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढय़ाच्या वेळीदेखील त्यांनी असाच पळ काढला, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गुजरातची वृद्धा दादरमध्ये अडकली मुंबईत आली कशी तेच कळले नाही, भोईवाडा पोलीस मदतीला धावले गुजरातची वृद्धा दादरमध्ये अडकली मुंबईत आली कशी तेच कळले नाही, भोईवाडा पोलीस मदतीला धावले
गुजरातच्या संस्कार नगरात राहणाऱया 75 वर्षीय वृद्धा घराबाहेर पडल्या आणि थेट दादर पूर्वेकडील एका पेट्रोल पंपजवळ सापडल्या. आपण गुजरातमध्येच आहोत...
चर्चगेट रेल्वे स्थानकात आग!धुराच्या लोटांमुळे प्रवासी-कर्मचाऱ्यांमध्ये घबराट; सुदैवाने जीवितहानी टळली
दहा लाखांसाठी सात महिन्यांच्या गर्भवती विवाहितेस बेदम मारहाण, पतीवर गुन्हा दाखल
70 वर्षांच्या आजोबांना झाला स्तनांचा कर्करोग, सुरुवातीचे लक्षण काय?
रिल्सचा नाद नडला! के पी फॉल्सच्या जंगलात अडकली तीन अल्पवयीन मुले
संध्याकाळी या 5 गोष्टी करा, मग पहा तुमचे आयुष्य कसे बदलते
अकोल्यात डीपीडीसीच्या बैठकीत शिवसेनेचा दणका, 29 कोटींचा निधी परत पाठवल्याने शिवसैनिक आक्रमक