दोनवेळा स्तनाचा कर्करोग, दोन्ही किडन्या निकामी.. अरुणा इराणी यांनी मुलाखतीत केले धक्कादायक खुलासे

दोनवेळा स्तनाचा कर्करोग, दोन्ही किडन्या निकामी.. अरुणा इराणी यांनी मुलाखतीत केले धक्कादायक खुलासे

अरुणा इराणी यांची गणना बॉलिवूडमधील सशक्त अभिनेत्रींमध्ये केली जाते. त्यांनी अभिनयाच्या जोरावर काही दशकांपूर्वीपासून इंडस्ट्रीवर राज्य केले आहे. वयवर्षे 80 असलेल्या अरुणा इराणी यांनी 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मुख्य भूमिका, गाजलेली नृत्यगीते, व्हॅंम्प ते आईच्या भूमिका. अशा विविधांगी भूमिका त्यांनी एकामागून एक साकारल्या आहेत. अलिकडेच एका मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. हे खुलासे ऐकून त्यांचे चाहते हैराण झाले आहेत. मुलाखतीदरम्यान अरुणा इराणी यांनी सांगितले की, त्यांनी एकदा नाही तर दोनदा स्तनाच्या कर्करोगाशी झुंज दिली आहे.

अलिकडेच झालेल्या मुलाखतीच्या माध्यमातून अरुणा इराणी म्हणाल्या की, एके दिवशी शूटिंग दरम्यान स्तनामध्ये काहीतरी गाठ आहे आणि ती दुखत असल्याचे जाणवू लागले. डाॅक्टरकडे गेल्यानंतर त्यांना कळले की, ही गाठ साधीसुधी नाही तर कॅन्सरची गाठ आहे. डॉक्टरांनी त्यांना गाठ काढून टाकण्याचा सल्ला दिला. तसेच यावर अधिक सजगता म्हणून डॉक्टरांनी केमोथेरपी सुचवली. परंतु केस गळण्याच्या आणि त्वचेतील बदलांच्या भीतीमुळे त्यांनी केमोथेरपी करण्यास नकार दिला. त्यानंतर त्या बऱ्या झाल्या. परंतु पुन्हा एकदा 2020 मध्ये कोविडच्या अगदी आधी, त्यांना स्तनाचा कर्करोग पुन्हा झाल्याचे निदान झाले. त्यावेळी मात्र केमोथेरपी घ्यावी लागली. यावर अधिक भाष्य करताना त्या म्हणाल्या, वयाच्या 60 व्या वर्षी मधुमेह झाला होता आणि त्यानंतर त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या.

या मुलाखतीत अरुणा इराणी यांनी रेखाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. ‘औरत औरत औरत’ चित्रपटात त्यांची भूमिका कशी कमी करण्यात आली हे त्यांनी सांगितले. रेखामुळेच त्यांना या चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते हेही त्यांनी सांगितले. साइनिंगची रक्कम दिल्यानंतरही त्यांना चित्रपटातून का काढून टाकण्यात आले असे निर्मात्यांना विचारले असता, निर्माते म्हणाले रेखा यांना तुम्ही त्या चित्रपटात नको आहात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;