वाशीत बेकायदा फेरीवाल्यांचा धुमाकूळ, शिवसेनेची विभाग कार्यालयावर धडक

वाशीत बेकायदा फेरीवाल्यांचा धुमाकूळ, शिवसेनेची विभाग कार्यालयावर धडक

नवी मुंबई शहराची विशेष ओळख असलेल्या वाशीमध्ये सध्या विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. बाजारपेठ म्हणून ओळख असलेले हे उपनगर बेकायदा फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडले आहे. गटारांची व्यवस्थित साफसफाई झाली नसल्यामुळे थोडा पाऊस पडला तरी पाणी तुंबत आहे. याचा जाब विचारण्यासाठी शिवसैनिकांनी आज नवी मुंबई महापालिकेच्या वाशी विभाग कार्यालयावर धडक दिली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने छेडलेल्या या आंदोलनात जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे,उपजिल्हाप्रमुख अतुल कुळकर्णी, उपशहरप्रमुख महेंद्र धुमाळ, मुरली पाटील, उपशहर संघटक सोनाली कदम, विनोदिनी आहिरे, विभागप्रमुख रावसाहेब जाधव, मोरेश्वर ठाकूर, नितीन देसाई, उपविभागप्रमुख अशोक भुवड, प्रकाश ओंबळे, शांताराम भेकरे, अपर्णा दुराफे, दिलीप चरवळ आदी सहभागी झाले होते. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विभाग अधिकारी सुखदेव येडवे यांची भेट घेऊन याप्रकरणी तातडीने कारवाईची मागणी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;