आलोकनगरात पुन्हा दरोडेखोरांचा धुमाकूळ, दोन घरे फोडली; नागरिकांमध्ये दहशत, महिनाभरापूर्वी टाकलेल्या दरोड्याची पुनरावृत्ती

आलोकनगरात पुन्हा दरोडेखोरांचा धुमाकूळ, दोन घरे फोडली; नागरिकांमध्ये दहशत, महिनाभरापूर्वी टाकलेल्या दरोड्याची पुनरावृत्ती

सातारा-देवळाई परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू आहे. महिनाभरापूर्वी आलोकनगर भागातील निलेश बागूल यांच्या घरी सहा सशख दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. या दरोड्याचा तपास अद्यापही लागलेला नसताना आज मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास आलोकनगर भागात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. आयटीआय कॉल नीत राहणारे संजय राजहंस आणि त्याच भागातील दत्ता बाघले यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला. बाधले यांच्या घरातून रोख सात ते आठ हजार रुपये पळवले तर राजहंस यांच्या घरात मात्र दरोडेखोरांच्या हाती काहीही लागले नाही. दरोडेखोरांजवळ तल वार, कोयते, टॉमी, सुरे असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. महिनाभरात या भागात पुन्हा दरोडा टाकल्याने पोलिसांच्या दुर्लक्षतेवर शिक्कामोर्तब झाले.

सातारा-देवळाई भागात दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू आहे. हे दरोडेखोर हातात टॉमी, कोयते, सुरे, काठ्या, तलवारी घेऊन फिरत असल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये दरोडेखोरांची प्रचंड दहशत आहे. मे महिन्यात सातारा परिसरातील आलोकनगर भागात गट नंबर 161 मध्ये राहणारे निलेश बागूल यांच्या घरावर दरोडा पडल्याची घटना घडली. सशस्त्र दरोडेखोरांनी लहान मुलाला चाकू लावून दीड लाखाचा ऐवज लुटून नेला होता. पोलिसांनी मात्र घरफोडीची नोंद केली होती. महिना उलटला तरी या दरोडधाचा तपास लावण्यात आला नसल्याने नागरिकांमधून पोलिसांबद्दल संताप व्यक्त होत आहे.

उद्योजक आणि व्यापाऱ्याच्या घरी पडलेल्या दरोड्याचा तपास लावण्यासाठी पथके तयार केली जातात. वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः तपास करू लागतात. त्यातील दरोडेखोरांचे एन्काउंटर केले जाते. मुद्देमाल हस्तगत केला जातो, मात्र बागुल सारख्या सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाच्या घरावरील दरोड्याचा तपास लावला जात नाहीत. वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी येऊन जात नाही. त्यांच्या दरोड्याच्या तपासासाठी पथके तयार केली जात नाहीत. यावरूच पोलीसांच्या कार्यपद्धतीबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सातारा पोलीस मात्र चोरी झाल्याच्या गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू असल्याचे सांगत आहेत.

पोलीस आले तसे निघून गेले

राजहंस यांच्या घरातून दरोडेखोर पसार झाल्यानंतर पोलिसांना कळवताच सातारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले, जोपर्यंत घरमालक लेखी तक्रार करीत नाही, तोपर्यंत पंचनामा करता येणार नाही, असे सांगून आल्या पावली पोलीस निघून गेल्याचे नागरिकांनी सांगितले.

बिट मार्शल झोपले, बायपासवरच गस्त

सातारा पोलिसांनी महिनाभरापूर्वी दरोडा पडल्यानंतर दोन दिवस गस्त घातली. त्यानंतर पोलिसांची गाडी कधीच या भागात फिरकली नाही. बिट मार्शल ही गस्तीवर येत नाही. बायपासवरच पोलिसांचा ताफा थांबलेला असतो. या भागात जुगार अड्डे, पत्त्यांचे क्लब सुरू असून त्यांना मात्र पोलिसांचे संरक्षण मिळते, पोलि सांचे पंटर या अनुधावर ठाण मांडून असतात, अशा तक्रारी यावेळी नागरिकांनी मांडल्या.

पालकमंत्र्यांच्या मतदारांची सुरक्षा धोक्यात

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील सातारा-देवळाई हा भाग असून या भागात दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू आहे. गल्लोगल्ली दहशतीचे वातावरणनिर्माण झाले असून मतदारांची सुरक्षा घोक्यात आली आहे. गोरगरिबांच्या घरावर दरोडे पडत असतानाही त्याचे कोणतेही सोयरसुतक पाल कमंत्र्यांना राहिलेले नाही. पालकमंत्र्यांचा पोलीस प्रशासनावर वचक राहिलेला नसल्यामुळेच धुमाकूळ सुरू असल्याचे मतदारांनी बोलून दाखवले.

जुन्या घरी झोपायला गेले, नवीन घर फोडले

त्याच भागात आयटीआय कॉलनीलगत दर्शनी भागात एम्पायर कन्स्ट्रक्शनचे सहा रो-हाऊस बांधण्यात आले आहेत. यातील पाच नंबरचे रो हाऊस हे दत्ता सुभाष बाधले यांचे आहे. या घरातील सर्वजण जुन्या घरी झोपण्यासाठी गेले असता मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी गेटवरून आत प्रवेश केला. घराच्या दरवाज्याचे लॅचेसचे कुलूप टॉमीच्या साह्याने तोडून घरात शिरले. खोलीतील कपाट तोडून त्यातील 8 हजार रुपयाची रोख रक्कम घेतली. कपडे व साड्या अस्ताव्यस्त करून टाकल्या. दिवाणची गादी बाजूला करून त्याचीही झडती घेतली. त्यानंतर दरोडेखोरांनी पोबारा केला. दत्ता बोधले यांनी घरफोडी झाल्याची पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यानंतरही पोलिसांनी दुपारपर्यंत घटनास्थळी भेट दिलेली नव्हती.

कुटुंब पेरणीला… दरोडेखोर घरात

बागूल यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याला महिना होत नाही तोच आज मंगळवारी आलोकनगर भागातील गट नंबर 161 मधील आयटीआय कॉलनीतील संजय मधुकर राजहंस हे पेरणीसाठी सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथे गेले आहेत. प्रत्यक्षदर्शनि दिलेल्या माहितीच्या आधारे राजहंस यांच्या घराला कुलूप असल्यामुळे मध्यरात्री पाच ते सहा दरोडेखोर हातात चाकू, टॉमी, कोयते, दांडे, सुरा घेऊन आले. त्यांनी सुरुवातीला समोरून घराचा लोखंडी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र हा दरवाजा तोडला जात नसल्याने पाठीमागे उत्तर दिशेला तोंड असलेल्या चॅनलगेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील दरवाजा तोडून खोलीत शिरले. दोन्ही खोलीतील कपाटे तोडून कपाटातील साड्या, कपडे इतरत्र फेकून दिले व दरोडेखोर तेथून पसार झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

संविधानचा अवमान करणारे, साजरा करत आहेत संविधान हत्या दिवस; ममता बॅनर्जींची भाजपवर टीका संविधानचा अवमान करणारे, साजरा करत आहेत संविधान हत्या दिवस; ममता बॅनर्जींची भाजपवर टीका
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या 25 जून हा ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून साजरा करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध...
Local Train Update – मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
इंडिगो फ्लाइटचं डोअर झालं लॉक, भूपेश बघेल यांच्यासह अनेक प्रवासी 40 मिनिटे विमानात अडकले
मदरशाला सुट्टी मिळावी म्हणून चौदा वर्षाच्या मुलाने अकरा वर्षाच्या मुलाचा विजेचा शॉक देऊन केला खून
शत्रू देशांच्या पाणबुड्यांचा काळ! INS Arnala हिंदुस्थानी नौदलाच्या ताफ्यात दाखल
वाचाल तर वाचाल! 21 राज्यांमध्ये 10 लाख लोकांनी स्वीकारला राष्ट्रीय वाचन दिनाचा संकल्प
कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 4 मृत्यू; देशात काय आहे Covid 19 ची स्थिती? वाचा…