जेवणात विष कालवून नववधूने घेतला नवऱ्याचा जीव, हातचं जेवत नसतानाही लढवली शक्कल
देशात आपल्याच पत्नीकडून पतीच्या होणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. आता झारखंडमध्येही एका पत्नीने आपल्याच पतीचा जीव घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 19 वर्षीय सुनीता सिंह या तरुणाचे 22 वर्षीय बुधनाथ सिंह याच्यासोबत महिन्याभरापूर्वी लग्न झाले होते. सुनीताला बुधनाथ बिल्कूल पसंत नव्हता. तरी सुनीताच्या कुटुंबीयांनी तिचे जबरदस्ती लग्न लावून दिले होते. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सुनीता सासर सोडून माहेरी आली होती. तेव्हा गावातल्या लोकांनी बैठक बोलावली आणि सुनीताची समजूत काढून तिला परत सासरी पाठवलं होतं.
तरी सुनीताला आपला नवरा बुधनाथ आवडत नव्हता. तिने दोन वेळा जेवणात विष घालून आपल्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. पण आपली पत्नी आपल्या जिवावर उठली आहे.याची कल्पना बुधनाथला आधीपासूनच होती. म्हणून बुधनाथने पत्नीने जेवण बनवलेलं खायला नकारि दिला. 14 जून रोजी सुनीता आणि बुधनाथ बाजारात गेले होते. तेव्हा सुनीताने बुधनाथना कीटकनाशक घ्यायला सांगितले. आणि शेतीसाठी हे कीटकनाशक गरजेचे आहे असे सांगितले.
त्यानंतर 15 जूनला सुनीताने बुधनाथसाठी जेवण बनवलं होतं. पण सुनीताने जेवण बनवलं म्हणून बुधनाथने जेवायला नकार दिला. पण सुनीताने बुधनाथसाठी चिकन बनवलं होतं. बुधनाथला चिकन खुप आवडत होतं. त्यामुळे बुधनाथने हे चिकन आवडीने खाल्लं. पण सुनीताने यात कीटकनाशक मिसळलं होतं. त्याच दिवशी बुधनाथचा मृत्यू झाला.
बुधनाच्या आईने पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. पोलिसांनी सुनीताला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा सुनीताने गुन्हा कबुल केला. याप्रकरणी पोलिसांनी सुनीताला अटक केली असून पुढील चौकशी सुरू केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List