रत्नागिरी जिल्ह्यातील तीन नद्यांनी ओलांडली इशारा पातळी; राजापूरात पूर

रत्नागिरी जिल्ह्यातील तीन नद्यांनी ओलांडली इशारा पातळी; राजापूरात पूर

गेले तीन दिवस सुरू असलेल्य मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले आहे. राजापूरातील अर्जुना नदी आणि कोदवली नद्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी जवाहर चौकात शिरले असून राजापूर बाजारपेठ जलमय झाली आहे. पुराचे पाणी दुकानात शिरल्याने व्यापारी वर्गाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील जगबुडी नदी, शास्त्री नदी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलाडल्यामुळे जिल्ह्यात नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे राजापूर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.जवाहर चौकात आलेल्या पुरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 24 तासांत राजापूर शहरात 118 मिमी पाऊस पडला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;