त्रिखंड योगामुळे सिंहस्थ कुंभमेळा 22 महिन्यांचा, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभ पर्वणीच्या तारखा जाहीर

त्रिखंड योगामुळे सिंहस्थ कुंभमेळा 22 महिन्यांचा, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभ पर्वणीच्या तारखा जाहीर

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्याला 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहणाने सुरुवात होणार आहे. पहिले अमृतस्नान 2 ऑगस्ट 2027 रोजी, तिसरे अमृतस्नान नाशिकला 11 सप्टेंबर, तर त्र्यंबकेश्वरला 12 सप्टेंबरला होईल. कुंभ समाप्ती 24 जुलै 2028 रोजी होणार आहे. तब्बल 75 वर्षांनी येणाऱया त्रिखंड योगामुळे हा कुंभमेळा 12 ऐवजी 22 महिने राहील. मुख्य पर्वण्यांव्यतिरिक्त पर्वस्नानांचे एकूण 97 मुहूर्त पुरोहित संघाने या वेळी जाहीर केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिक, त्र्यंबकेश्वर येथील सर्व तेरा आखाडय़ांचे साधू, महंत यांची बैठक पार पडली. यात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा निश्चित करण्यात आल्या.

या बैठकीस अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्रपुरी महाराज, जुना आखाडय़ाचे महंत हरीगिरी महाराज, महंत भक्तिचरणदास, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, सीमा हिरे, राहुल ढिकले, राहुल आहेर, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका प्रशासक मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे आदी उपस्थित होते.

31 ऑक्टोबर 2026 रोजी गुरू सिंह राशीत प्रवेश करणार असून या दिवशी नाशिक, त्र्यंबकेश्वरला कुंभ पर्वाचे ध्वजारोहण होईल. त्यानंतर पहिले आणि दुसरे अमृतस्नान हे दोन्ही ठिकाणी सोमवार, 2 ऑगस्ट 2027 आणि मंगळवार, 31 ऑगस्ट 2027 रोजी होणार आहे. नाशिक येथे तिसरे अमृतस्नान शनिवारी, 11 सप्टेंबर 2027 ला, तर त्र्यंबकेश्वर येथे रविवारी, 12 सप्टेंबर 2027 ला होईल.

75 वर्षांनी त्रिखंड योग

सिंहस्थ कुंभमेळ्यातील गोदावरी स्नान व दर्शनाचे अनन्यसाधारण महत्त्व असते. या वेळचा कुंभमेळा हा त्रिखंडी असणार आहे. या काळात गुरू कर्क राशीतून सिंह, नंतर कन्या आणि पुन्हा सिंह राशीत प्रवेश करेल. त्यामुळे कुंभमेळा 22 महिने चालणार आहे. याआधी सन 1956च्या कुंभपर्वावेळी असा योग आला होता, अशी माहिती नाशिक येथील पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी दिली. नाशिक, त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघांनी 22 महिन्यांमधील तीर्थस्नान, दर्शन व यात्रेचे एकूण 97 मुहूर्तही सांगितले. त्यात नाशिकच्या 44 आणि त्र्यंबकेश्वर येथील 53 पर्वस्नानांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘तिने चित्रपट साइन केला की तो बंद पडायचा’, बॉलिवूड अभिनेत्रीला ‘पनौती’ म्हणायचे सगळे,पण एका चित्रपटाने बदललं नशीब ‘तिने चित्रपट साइन केला की तो बंद पडायचा’, बॉलिवूड अभिनेत्रीला ‘पनौती’ म्हणायचे सगळे,पण एका चित्रपटाने बदललं नशीब
चित्रपटसृष्टीतील कलाकारांना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात बऱ्याचदा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. फार कमी स्टार्स असतात जे त्यांच्या पहिल्या चित्रपटाने...
युक्रेनचा रशियावर पुन्हा हल्ला, 1100 किलो स्फोटकांनी क्रिमियन पूल उडवला
अखेर राज्यपालांना सुप्रीम कोर्टाची ताकद कळली, 2 विधेयकांना मंजुरी दिल्यानंतर CM स्टॅलिन यांचा टोला
Ratnagiri News – पतितपावन मंदिर प्रकरण, भाजप नेत्याला वाचवण्याचा रत्नागिरी शहर पोलिसांचा प्रयत्न; भजनीबुवांची पोलीस अधीक्षकांकडे धाव
Pune News – शेतात काम करत असताना बिबट्याचा हल्ला, महिला जखमी
क्या हुआ तेरा वादा? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना आक्रमक, 5 जूनपासून मराठवाड्यात जन आंदोलन
सिद्धार्थ चांदेकरच्या आईचा लग्नानंतर नवा प्रवास; चाहत्यांना दिली गुड न्यूज, लेकाची आईसाठी खास पोस्ट