Kitchen Tips- हे पदार्थ कधीही नॉन-स्टिक पॅनमध्ये शिजवू नयेत, वाचा

Kitchen Tips- हे पदार्थ कधीही नॉन-स्टिक पॅनमध्ये शिजवू नयेत, वाचा

नॉन-स्टिक पॅन हे आपल्या स्वयंपाकघरातील एक अतिशय महत्त्वाचा भाग आहेत जे बहुतेक घरांमध्ये वापरले जाते.  मूळात ही भांडी वापरण्यास अतिशय उत्तम आणि सुलभ आहेत. तसेच या भांड्यामध्ये स्वयंपाक सुद्धा उत्तम करता येतो. परंतु या भांड्यामध्ये आपण सर्वच पदार्थ करु शकत नाही. त्यामुळे या भांड्यामध्ये आपण कोणते पदार्थ करु नयेत हे जाणून घेऊया.  या भांड्यामध्ये कोणते पदार्थ शिजवू नयेत, हे मात्र आपल्याला माहीत नसते. अशावेळी आपण नको असलेले पदार्थ शिजवले तर या भांड्याचे कोटिंग खराब होण्याची भीती असते.

स्टिर फ्राय
आजकाल स्टिर फ्राय या भाज्या खूप लोकप्रिय होत आहेत. ही एक फॅन्सी डिश आहे आणि त्याच वेळी ती जास्त तेल आणि मसाल्यांशिवाय बनवली जाते. म्हणून सध्याच्या घडीला ती अनेकांना आवडते. परंतु अशा स्टिर फ्राय भाज्या ज्या कॅरॅमलाइज्ड कराव्या लागतात म्हणजेच जास्त वेळ शिजवाव्या लागतात आणि जास्त आचेवर लागतात त्या नॉन-स्टिक पॅनमध्ये शिजवू नयेत.

नॉन-स्टिक पॅनमध्ये जास्त आचेवर ठेवू नये. नॉन-स्टिक पॅन जास्त वेळ गरम केला तर त्याचे बाह्य आवरण जळण्याचा संभव असतो. तसेच मांसाहारी पदार्थ शिजवण्यासाठी नॉन-स्टिक भांडी वापरु नयेत.

सॉस, सूप, मांस, खीर जे पदार्थ खूप उशीरापर्यंत शिजवावे किंवा ढवळावे लागतात असे पदार्थ नॉन-स्टिक भांड्यामध्ये शिजवू नयेत.

नॉन-स्टिकची भांडी कधी वापरावी?

लवकर शिजतील असे कोणतेही पदार्थ नाॅन स्टिकवर करणे सर्वात उत्तम. फिश फ्राय, चीज डिश, नूडल्स इत्यादी नॉन-स्टिक तव्यावर शिजवता येतात. हे सर्व पदार्थ खूप लवकर शिजतील आणि त्याच वेळी तुमच्या तव्यावर कोणतीही समस्या येणार नाही.

नॉन-स्टिक तव्यावर मिक्स व्हेज, चीला, ऑम्लेट सारख्या गोष्टी देखील खूप चांगल्या प्रकारे शिजतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;