मुंबईत पूरही नाही येणार आणि लाखो लिटर पाणीही मिळणार, पालिका उभारणार नवीन पंपिंग स्टेशन

मुंबईत पूरही नाही येणार आणि लाखो लिटर पाणीही मिळणार, पालिका उभारणार नवीन पंपिंग स्टेशन

दरवर्षी उन्हाळ्यात मुंबईत पाण्याची टंचाई निर्माण होते, त्यामुळे अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. मुंबईला मिळणाऱ्या पाणी वाढावे म्हणून पालिकेने एक नवीन योजना हाती घेतली आहे. ही योजना कार्यान्वित झाली तर मुंबईला दरवर्षी 72 हजार दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

प्रत्येक पावसात मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या विहार तलाव ओव्हरफ्लो होतं. आणि हे पाणी मिठी नदीत प्रवाहित होतं समुद्राला जाऊन मिळतं. हे पाणी शु्द्ध करून पुन्हा वापरलं जाणार आहे. मान्सून काळात मुंबईतल्या तीन मोठे तलाव तुळशी, विहार आणि पवई तलावातील अतिरिक्त पाणी मिठी नदीत जातं. त्यामुळे धारावी, बीकेसी आणि कुर्ला भागात पाणी साचतं तसेच पूर परिस्थितीही निर्माण होतं. मुंबईतल्या पूर परिस्थितशी आणि पाणी टंचाईशी सामना करण्यासाठी पालिका एक पंपिग स्टेशन उभारणार आहे. या पंपिंग स्टेशनची क्षमता 200 दशलक्ष लिटर इतके आहे. यासाठी 100 कोटी रुपये खर्च होईल. या पंपिंग स्टेशनचे काम सुरू असून 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;