अडकलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना परत पाठवण्यासाठी इराणचा मोठा निर्णय!

अडकलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना परत पाठवण्यासाठी इराणचा मोठा निर्णय!

इराणमध्ये अडकलेले हिंदुस्थानी विद्यार्थी सध्याच्या घडीला चिंतेत आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता हे विद्यार्थी कसे परततील याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. इराणने सोमवारी हिंदुस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. हिंदुस्थानने इराणमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले पाहिजे असे म्हटले होते. यालाच प्रतिसाद देत आता इराणने एक नवीन मार्ग शोधला आहे.

तेहरानने याबाबत म्हटले आहे की, इराणचे हवाई क्षेत्र बंद असले तरी सर्व जमीनी मार्ग खुले आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी नागरिक तेथून सुरक्षितपणे बाहेर पडू शकतात. इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हिंदुस्थानला आश्वासन दिले आहे की, त्यांच्या राजदूतांना आणि सामान्य नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मदत केली जाईल.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटले?
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “सध्याची परिस्थिती आणि विमानतळ बंद असल्याने, सर्व जमीनी मार्ग खुले आहेत, जेणेकरून अडकलेले नागरिक बाहेर जाऊ शकतील.”

इराणने हिंदुस्थानला आवाहन केले आहे की, जमीनी मार्गाने देशाबाहेर जाऊ इच्छिणाऱ्यांची नावे, पासपोर्ट क्रमांक, वाहनांची माहिती, प्रवासाचा वेळ आणि सीमा ही सर्व माहिती इराणच्या जनरल प्रोटोकॉल विभागाला देण्यात यावी. यामुळे इराण राजदूत आणि इतरांचा प्रवास सुरक्षित राहावा यासाठी आवश्यक व्यवस्था करू शकेल.

इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे इराणच्या अनेक शहरांमध्ये हजारो हिंदुस्थानी अडकले आहेत. यामध्ये1,500 हून अधिक हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचा समावेश आहे, त्यापैकी बहुतेक जम्मू आणि काश्मीरमधील आहेत.

सोमवारी (16 जून 2025) हिंदुस्थानने सांगितले की, इराणमध्ये राहणाऱ्या काही हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना तेथील सुरक्षित भागात हलवण्यात आले आहे. असेही सांगण्यात आले की इतर कोणते उपाय करता येतील यावरही विचार केला जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “तेहरानमधील हिंदुस्थानी दूतावास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि विद्यार्थ्यांशी सतत संपर्कात आहे. दूतावासाच्या मदतीने काही विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आले आहे.” दूतावासाने एक गुगल फॉर्म देखील शेअर केला आहे. या फाॅर्ममध्ये हिंदुस्थानींना त्यांची माहिती भरण्यास सांगितले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;