मावळ दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा – संजय राऊत

मावळ दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा – संजय राऊत

कालचे बळी आहे भ्रष्टाचाराचे आणि निष्काळजीपणाचे आहेत असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच मावळ दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.

आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, कालचे बळी आहे भ्रष्टाचाराचे आणि निष्काळजीपणाचे आहेत. मंजूर झालेले पैसे वापरले गेलेत नाहीत. ते कोणाच्या खिशात गेलेत. मूळ आकडा आठ ते 10 कोटीचा असावा पण त्यानंतर मंत्र्यांनी याला पत्र द्या त्याला पत्र द्या. पैसे कुठे गेले? मंजूर झाले आहेत ना? कालच्या पूल दुर्घटनेला आणि कालच्या बळींना अजित दादा पवार जेवढे जबाबदार आहेत तेवढे त्यावेळचे मुख्यमंत्री जे कोणी असतील ते सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. हा पैसा कुठे कुठे गेला याची चौकशी होणं गरजेच आहे. आर्थिक गुन्हे शाखेने, ईडीन कारवाई करावी. हिम्मत आहे तर विचारा तिकडे धुळ्यामधल्या विश्राम गृहावरती एक कोटी आणि 85 लाख सापडले. त्याच्यावरती फक्त दखल पात्र गुन्हा दाखल होतो. इथे कोट्यावधी रुपयाचा अपहार झालेला दिसतो आहे. आता अजित पवार खुलासा करतील याच्यावरती. त्या खुलाशाला काय किंमत नाही. मुख्यमंत्र्यांच्या खुलाशाला हा महाराष्ट्र हिंग लावून विचारत नाही. मुख्यमंत्री खोट बोलतात. या कामासाठी माझ्या हिशोबाने 15 कोटी रुपयांचा निधी मागितला आणि आठ कोटी रुपये मंजूर झाले. मंजूर झालेला पैसा त्या पुलासाठी योग्य वेळी वापरला असता तो पूल उभा झाला असता आणि काल जे 40-45 लोक जी बेपत्ता आहेत ते प्राणाला मुकले नसते. अजित दादा पवार काय करतायत? अजित दादा पवार जे नाकाने कांदे सोलतायत ना याच्या अंगावर जा त्याच्या अंगावर जा याला दम द्या त्याला दम द्या. कोण आहे ते, तुमच्या राज्यात माणसांचे बळी गेले आहेत. तुम्ही नैतिक जबाबदारी तरी घ्या. सांगा चूक झाली म्हणून. मुख्यमंत्री काय सांगतायत?

तसेच जिथे जिथे अशा प्रकारचे अपघात घातपात आणि प्रसंग घडले तिथे तिथे रवींद्र चव्हाणांचच नाव येत आहेत. तिथे यांचीच नावं येत आहेत. कोण आहेत त्या भागाचे आमदार आणि मंत्री? जिथे पुतळा आहे त्यांनी त्या अरबी समुद्रात उडी मारली पाहिजे प्रायश्चित म्हणून. जे कोणी असतील ते ज्या कोणी त्या पुतळ्याचं उद्घाटन केलं. ती जमीनच खचली आहे कारण ती जमीन भ्रष्टाचाराची आहे. छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा पूतळा, इंद्रायणी नदीवरचा पूल यात सुद्धा भ्रष्टाचार होतो आहे. या सरकाराचे आमदार, मंत्री हे भ्रष्टाचार करत आहेत आणि देवेंद्र फडणवीस नाकान कांदे सोलता आहेत. फडणवीस काय म्हणतात? भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवू. तुरुंग म्हणजे काय तर भाजप असेही संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;