‘ईएसआय’ हॉस्पिटलच्या कामगारांना चार महिन्यांपासून पगार नाही! कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष, संपाचा इशारा

‘ईएसआय’ हॉस्पिटलच्या कामगारांना चार महिन्यांपासून पगार नाही! कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष, संपाचा इशारा

राज्य कामगार विमा योजनेच्या (‘ईएसआय’) शेकडो कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून पगारच मिळाला नसल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाने तातडीने पगार द्यावेत, अन्यथा काम बंद करून संप करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी राज्य कामगार विमा योजनेच्या (ईएसआय) महाराष्ट्रातील सर्व हॉस्पिटलमध्ये विविध पदांवर काम करण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आली. मुंबईतदेखील कांदिवली, मुलुंड, वरळी आणि उल्हासनगर येथील हॉस्पिटलमध्येसुद्धा कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. यामध्ये नर्सेस, लॅब टेक्निशिएन, क्लार्क, शिपाई आदी पदांवर कार्यरत आहेत. हे कर्मचारी प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत असताना काही हॉस्पिटलमध्ये पंत्राटी कर्मचाऱ्यांचा तब्बल चार महिन्यांपासून पगार झालेला नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;