Air India Plane Crash – 10 जूनला बोहल्यावर चढला, 12 जूनला लंडनला निघाला… अवघ्या दोन दिवसात नवविवाहितेने पतीला गमावले

Air India Plane Crash – 10 जूनला बोहल्यावर चढला, 12 जूनला लंडनला निघाला… अवघ्या दोन दिवसात नवविवाहितेने पतीला गमावले

अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत वडोदरा शहरातील भाविक माहेश्वरी याचा मृत्यू झाला आहे. भाविक हा लंडनला नोकरीला होता तो लग्नासाठी दहा दिवसांची सुट्टी घेऊन आला होता. 10 जूनला धुमधडाक्यात लग्नही झाला आणि 12 जूनला आपल्या नव्या नवरीचा निरोप घेऊन भाविक निघाला. मात्र वाटतेच काळाने त्याच्यावर घाला घातला.

2 जूनला भाविक लंडनहून वडोदऱ्याला आला होता. 10 जूला त्याचे लग्न होणार होते. भाविकचा साखरपुडा गेल्या वर्षीच झाला होता. लग्नानंतर दोन दिवसातच तो लंडनला परतणार होता. भाविकला निरोप द्यायला त्याची नवविवाहित पत्नी एअरपोर्टला आली होती. पतीला हसत हसत तिने निरोप दिला. मात्र काही वेळातच भाविक ज्या विमानाने लंडनला जात होता ते क्रॅश झाल्याची बातमी त्यांना मिळाली.

दोन दिवसांपूर्वी वाजत गाजत भाविकची वरात घरात आणली होती. ज्या घरात आनंदी आनंद होता त्या घऱात आता भयाण शांतता पसरली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;