समृद्धीवर सुविधांची वानवा, दीडशे किलोमीटरपर्यंत ना पंक्चरचे दुकान ना पेट्रोलपंप ना हॉटेल

समृद्धीवर सुविधांची वानवा, दीडशे किलोमीटरपर्यंत ना पंक्चरचे दुकान ना पेट्रोलपंप ना हॉटेल

मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण गेल्या तीन दिवसांपूर्वी पार पडले असले तरी या महामार्गावर सेवा आणि सुविधांची मात्र वानवा निर्माण झाली आहे. दीडशे किलोमीटरपर्यंतच्या अंतरात कुठेही पंक्चरचे दुकान, पेट्रोलपंप, हॉटेल आणि स्वच्छतागृह नाही. त्यामुळे वाहनचालकांना या मार्गावरून प्रवास करताना मोठी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. या महामार्गावरील रात्रीचा प्रवास जिकिरीचा आणि धोकादायक ठरणार आहे.

मुंबई-नागपूर प्रवास अतिजलद व्हावा यासाठी 701 किलोमीटरचा नवीन समृद्धी महामार्ग अंदाजे 55 हजार कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला आहे. यां महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी हा 11 मे 2022 रोजी सुरू करण्यात आला. त्यानंतर दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर हा 26 मे 2023 रोजी सुरू झाला. नंतर भरवीर ते इगतपुरी हा चौथा टप्पा 4 मार्च 2024 रोजी सुरू करण्यात आला. शेवटचा पाचवा टप्पा इगतपुरी ते आमने (भिवंडी) हा 5 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आला.

या महामार्गावर तब्बल 150 किलोमीटर अंतरात प्रवाशांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. किमान 35 ते 40 किलोमीटरच्या अंतरावर स्वछतागृह, हॉटेल, पेट्रोलपंप, गॅरेज, टायर दुकान असणे गरजेचे होते. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

पाणी, बिस्किटे, फळे जवळ ठेवा
समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना आपली वाहने अपडेट ठेवावी लागणार आहेत. वाहनात पेट्रोल, डिझेल, गॅस व चार्जिंग यांसह गाडीचे टायर अन्य बाबी घेतल्यानंतर या महामार्गावरून प्रवास सुरू करता येणार आहे. आपल्या वाहनात पिण्याचे पाणी, सुकामेवा, बिस्किटे, फळे सोबत घेतल्यानंतरच आपले वाहन समृद्धी महामार्गावर आणावे लागणार आहे. या महामार्गावर सुविधा उपलब्ध नसल्याने वाहनचालक आणि प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;