Chenab Railway Bridge- श्रेय माझ्या एकटीचे नाही! कृपया मला अनावश्यक प्रसिद्धी देऊ नका- भू तंत्रज्ञान सल्लागार डाॅ. जी माधवी लता यांचे स्पष्ट मत

Chenab Railway Bridge- श्रेय माझ्या एकटीचे नाही! कृपया मला अनावश्यक प्रसिद्धी देऊ नका- भू तंत्रज्ञान सल्लागार डाॅ. जी माधवी लता यांचे स्पष्ट मत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज असलेल्या चिनाब ब्रिजचे उद्घाटन केले. हे उद्घाटन झाल्यानंतर, या पूलासाठी भू-तंत्रज्ञान सल्लागार म्हणून काम करणाऱ्या डॉ. जी. माधवी लता यांच्याबद्दल वर्तमानपत्र आणि सोशल मीडियावर खूप कौतुक झाले. यावर जी. माधवी लता यांनी या पुलाच्या यशाचे श्रेय हे हजारो अनसंग हिरोंना दिलेले आहे. याचबरोबर त्यांनी मला अनावश्यक प्रसिद्धी देऊ नका असे आवाहनही केले आहे.

 

माधवी लता यांनी आपली भूमिका मोठ्या सांघिक प्रयत्नांचा भाग असण्यावरच भर दिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब पुलाचे उद्घाटन केले, जो जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे. देशाने या कामगिरीचा आनंद साजरा केला, तेव्हा दीर्घकाळ योगदान देणाऱ्या प्रोफेसर जी. माधवी लथा यांनी हजारो “अनसंग हिरोंना” श्रेय दिले आहे. तसेच लोकांनी त्यांना उगाचच प्रकाशझोतात आणू नये अशी विनंतही त्यांनी केली आहे.

माधवी लता यांच्यावर झालेल्या कौतुकानंतर त्या म्हणाल्या, या पुलाच्या कामासाठी मी लाखो अज्ञात नायकांना सलाम करते. “माझी भूमिका उतार स्थिरीकरण योजना विकसित करण्यात आणि उतारावरील पाया डिझाइन करण्यात मदत करणे ही होती,” असे तिने उद्घाटनानंतर शेअर केलेल्या लिंक्डइनवरील संदेशात त्यांनी म्हटले आहे.

चिनाब पुलाशी गेल्या 17 वर्षांपासून संबंधित असलेल्या डॉ. लता यांनी, त्यांच्यावर झालेल्या कौतुकाला त्यांनी उगाचच मला प्रसिद्धी झोतात आणू नका असे स्पष्टपणे म्हटले आहे. त्यांच्यावर मोहिमेतील महिला, तसेच पूल बांधण्यासाठी चमत्कार करणारी अशी अनेक बिरुदं त्यांच्यावर माध्यमात आली होती यावर त्यांनी या सर्व बिरुदांना निराधार असे म्हटले आहे. पुलाचे काम करणाऱ्या करणाऱ्या हजारोंपैकी मी एक आहे असे त्या म्हणाल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;