ट्रम्प यांना प्रत्युत्तर देण्याची हिंमत मोदी, शहा यांच्यात नाही; संजय राऊत यांचा निशाणा

ट्रम्प यांना प्रत्युत्तर देण्याची हिंमत मोदी, शहा यांच्यात नाही; संजय राऊत यांचा निशाणा

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने दहशतवादाविरोधात लढाई सुरू केली. त्यात चांगले यश मिळत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावर हे युद्ध थांबवण्यात आले. ट्रम्प यांनी अनेकदा आपल्यामुळेच हे युद्ध थांबले, असे स्पष्ट केले आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा मूग गिळून गप्प आहेत. ट्रम्प यांना प्रत्युत्तर देण्याची त्यांची हिंमत नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

ते प्रेसिडेंट ट्रम्प यांना उत्तर देऊ शकत नाहीत. ट्रम्प यांनी आतापर्यंत 16 वेळा सांगितले, मी युद्ध थांबवायला सांगितले. दहशतवादाविरोधातील युद्ध आपण ट्रम्प यांच्या दबावाखाली थांबवले आहे, अशी कबुली ट्रम्प अनेकदा देत आहेत. तरीही ट्रम्प यांना उत्तर देण्याची हिंमत मोदी, शहा किंवा फडणवीस यांच्यात नाही. मोदी यांच्या कार्यकाळात पराराष्ट्र धोरण सपसेल अपयशी ठरले आहे. हिंदुस्थानला जगभरात एकही मित्र नाही. तसेच ट्रम्प यांच्यामुळेच युद्ध थांबले, असे स्पष्ट होत असतानाही मोदी, शहा त्यावर काहीही बोलत नाही, असे संजय राऊत म्हणाले.

धर्मांध, जातीयवादी आणि महाराष्ट्रद्रोही भाजपसोबत अजित पवार गेले आहेत. लूटा, खा आणि वाटा, हाच भाजपचा विचार आहे. अशा विचारांसोबत सुप्रिया सुळे जातील, असे वाचत नाही. शरद पवार यांचा फुले, शाहू, आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांचा विचार आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे चुकीच्या मार्गाने जातील, असे वाटत नाही, असे संजय राऊत म्हणाले. यंदाचा 19 जूनचा शिवसेनेचा वर्धापनदिन महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी, मुंबई मराठी माणसाचीच राहावी, यासाठी आम्ही कोणत्याही गोष्टीसाठी तयार आहोत. सर्व मतभेद बाजूला ठेवत मराराष्ट्रहितासाठी सर्वांनी एकत्र यावे, हीच आमची भूमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;