गोगावलेंचा आणखी एक कारनामा ; परवानगीविनाच सावित्रीतील गाळ काढण्याचे घाईघाईत उद्घाटन

गोगावलेंचा आणखी एक कारनामा ; परवानगीविनाच सावित्रीतील गाळ काढण्याचे घाईघाईत उद्घाटन

वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असलेले मिंधेंचे महाड येथील आमदार भरत गोगावले यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. सावित्री नदी पात्रातून गाळ उपसण्याची कोणतीही परवानगी नसताना गोगावले यांनी आज चक्क या गाळ काढण्याच्या कामाचे स्वयंघोषित उद्घाटन केले. याची गंभीर दखल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने घेतली आहे. पक्षाचे महाड विधानसभा उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून या प्रकरणाची चौकशी करून गोगावलेंवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

मी मंत्री असल्याने मी करीन तीच पूर्व दिशा असा भरत गोगावले यांचा महाडमध्ये कारभार सुरू आहे. महाडमधील सावित्री नदी पात्रातील गाळ काढण्याचे उद्घाटन आज गोगावले यांनी धावत पळत जाऊन केले. परंतु हा गाळ उपसण्याची कोणतीही शासकीय परवानगी त्यांनी घेतली नसल्याचे उघड झाले. शिवसेनेचे महाड विधानसभा उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी गोगावलेंच्या या कारनाम्याचा पत्रकार परिषद घेऊन भंडाफोड केला. ते म्हणाले, गोगावलेंच्या या गाळ उपसा उद्घाटनाबाबत मी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना विचारले असता त्यांनी गाळ काढण्याच्या कामाच्या मंजुरीची प्रक्रिया अद्याप सुरू आहे असे मला स्पष्टपणे सांगितले. याचाच अर्थ कोणतीही वैध शासकीय परवानगी मिळाली नसतानाही मंत्री भरत गोगावले यांनी कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन करून या कामाचे उद्घाटन केले आहे.

लवकरात लवकर कारवाई करा !
याप्रकरणी ओझर्डे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात लवकरात लवकर गुन्हा दाखल झाला नाही तर संबंधित मंत्री आणि जबाबदार अधिकाऱ्यांची नावे नमूद करून सीआरपीसी कलम 156 (3) अन्वये थेट न्यायालयात अर्ज दाखल केला जाईल, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;