Delhi Fire – आधी भाऊ-बहीण, मग वडिलांनी घेतली उडी, इमारतीच्या भीषण आगीमुळे तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Delhi Fire – आधी भाऊ-बहीण, मग वडिलांनी घेतली उडी, इमारतीच्या भीषण आगीमुळे तिघांचा दुर्दैवी मृत्यू

दिल्लीतील द्वारका सेक्टर 13 मधील एका इमारतीत भीषण आग लागल्याची घटना घडली. ‘सबद अपार्टमेंट या इमारतीतील एका खोलीत मंगळवारी अचानक आग लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला. या आगीतून वाचण्यासाठी एका कुटुंबातील दोन मुलं आणि त्यांच्या वडिलांनी इमारतीवरून उडी मारली. पण दुर्दैवाने तिघांचाही मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी आगीचे लोळ इतके भयंकर होते की त्यामुळे एका कुटुंबातील लोकांनी जीव वाचवण्यासाठी मोठे पाऊल उचलले. यावेळी कुटुंबातील भाऊ-बहीण आणि मग वडिलांनी इमारतीवरून उडी घेतली. मात्र जीव वाचवण्यासाठी घेतलेली उडी तिघांच्याही जीवावर बेतली. उंचावरून उडी घेतल्यामुळे दुर्दैवाने तिघांचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळतातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ‘सबद अपार्टमेंटमधील एका खोलीतून आगीचे लोळ उठताना दिसत आहेत.

 

दरम्यान, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी बचावकार्य करत असताना नागरिकांना शांत राहून सहकार्य करण्याचे आणि कोणत्याही प्रकारच्या अफवा न पसरवण्याचे आवाहन केले. ज्या इमारतीत आग लागली त्या इमारतीत राहणाऱ्या सर्व लोकांनी सोसायटीमधील काही लोकांवर आरोप केले आहेत. इमारतीत आग लागल्याचे समजल्यावरही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. या संपूर्ण प्रकरणात निष्काळजीपणा दाखवण्यात आला, असे ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;