शिवसैनिकांनो, मुंबईकरांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरा! उद्धव ठाकरे यांचा आदेश

शिवसैनिकांनो, मुंबईकरांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरा! उद्धव ठाकरे यांचा आदेश

पावसाने बेजार झालेल्या लोकांना मदतीची गरज आहे. शिवसैनिकांनो, रस्त्यावर उतरा आणि लोकांना मदतीचा हात द्या, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. तशा आशयाची पोस्ट त्यांनी शिवसेनेच्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवर केली.

याच पोस्टमध्ये उद्धव ठाकरे पुढे म्हणतात, एका पावसात मुंबई तर बुडालीच, पण मेट्रोच्या भुयारी मार्गात पाणी शिरल्याने महायुती सरकार आणि मिंध्यांचा भ्रष्टाचार उघडा पडला. तीन वर्षे मुंबई महापालिका भाजप आणि मिंधे टोळीच्या हातात आहे. या काळात जनतेच्या पैशाची फक्त लूट झाली. त्याचा समाचार शिवसेना निश्चितच घेईल नव्हे घेणारच.

वेळेपूर्वीच मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने सर्वांची दाणादाण उडवली. मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले. कामासाठी निघालेले चाकरमानी अडकून पडले. मुंबईतील या परिस्थितीचा आढावा घेताना मुंबईकरांची आपल्यालाच काळजी घ्यायची आहे असे सांगत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना तातडीने मुंबईकरांच्या मदतीसाठी धावून जाण्यास सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;