ऑपरेशन सिंदूरबाबतच्या भूमिकेवर शरद पवार ठाम; राष्ट्रवादीच्या मासिकातील उल्लेखामुळे चर्चा

ऑपरेशन सिंदूरबाबतच्या भूमिकेवर शरद पवार ठाम; राष्ट्रवादीच्या मासिकातील उल्लेखामुळे चर्चा

पहलगाम हल्ला, कश्मीरमधील दहशतवाद आणि दहशतवादाविरोधात हिंदुस्थानने राबवलेले ऑपरेशन सिंदूर याबाबत माहिती देण्यासाठी मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प हे आपणच युद्ध थांबवायला सांगितले, असा डांगोरा पिटत आहे, याबाबत मोदी सरकारने माहिती द्यावी, अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत विशेष अधिवेशनाची गरज नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच ते त्यांच्या भूमिकवेर ठाम आहेत. त्यांच्या या भूमिकेबाबत राष्ट्रवादीच्या मासिकात उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत.

ऑपरेशन सिंदूरसंदर्भात माहिती मिळण्याकरता सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येतेय. मात्र, अशा विशेष अधिवेशनाची गरज नाही. विशेष अधिवेशनाला माझा विरोध नाही. पण हा विषय अत्यंत संवेदनशील असल्याने त्यावर खुली चचर्चा होऊ शकत नाही. याच्या आधी एक दोनवेळा असे प्रकार झाले आहेत. त्यावेळी संरक्षणमंत्र्यांनी मला आणि काही लोकांना बोलावलं, काय प्रकार झाला याची माहिती दिली. कारण, त्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात. नेमकं काय घडलंय हे सरकारने विशेष अधिवेशनात सांगावं, अशी सर्वांच अपेक्षा असणार. पण याबाबतीत बोलण्यावर मर्यादा येतील विशेष अधिवेशन बोलवायला हरकत नाही. पण त्यापेक्षा दहा- वीस लोकांना बोलावून यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलं पाहिजे काय स्थिती आहे, आपण काय केले आहे याची माहिती दिली पाहिजे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;