Ratnagiri News – दापोली तालुक्यात केळशी सजाचे तलाठी 20 हजारांची लाच घेताना ACB च्या जाळ्यात

Ratnagiri News – दापोली तालुक्यात केळशी सजाचे तलाठी 20 हजारांची लाच घेताना ACB च्या जाळ्यात

उत्पन्नाच्या दाखल्याच्या अर्जावर सही व शिक्का देण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना दापोली तालुक्यातील केळशी सजाचे तलाठी राजेंद्र उंडे यांना मंगळवारी 10 जून 2025 रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. यामुळे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या उत्पन्नाच्या दाखल्याच्या अर्जावर स्वाक्षरी व शेरा देण्याकरीता ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) राजेद्र उंडे यांच्याकडे 5 जुन रोजी 20 हजार रुपये मागितले होते. तलाठ्यांनी केलेल्या मागणीनुसार तक्रारदार 20 हजार रुपये घेऊन 10 जुन रोजी दुपारी 2.30 वाजता दापोली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखलं झाले. यावेळी तलाठी भवन येथे तक्रारदाराने तलाठी राजेंद्र उंडे यांना पैसे दिले आणि याचवेळी पैसे घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पंचांसमक्ष ताब्यात घेतले.

या कारवाईत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे रत्नागिरी येथील पोलीस उपाधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सहाय्यक फौजदार चांदणे, हवालदार संजय वाघाटे, विशाल नलावडे, श्रेया विचारे, दीपक आंबेकर, कॉनस्टेबल  हेमंत पवार, राजेश गावकर,  समिता क्षीरसागर, चालक प्रशांत कांबळे सहभागी झाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लग्नाच्या तीन वर्षांनंतर आलिया भट्टने का बदलले नाव? लग्नाच्या तीन वर्षांनंतर आलिया भट्टने का बदलले नाव?
    बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली आलिया भट्ट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिचा दमदार अभिनय असो किंवा
ट्रम्प हिंदुस्थानचा अपमान करत असताना मोदी गप्प आहेत, हे कमजोर पंतप्रधान असल्याचे लक्षण – संजय राऊत
मुंबईवर कब्जा मिळवण्यासाठी शहा आणि त्यांचा एसंशिं गट कोणत्याही थराला जाईल, मात्र…; संजय राऊत यांनी ठणकावले
श्री विठ्ठल मंदिर परिसरात VIP वाहनांना बंदी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा मोठा निर्णय
प्रभागरचनेसाठी पुणे महापालिका घेणार ‘गुगल अर्थ’चा आधार
फक्त गव्हाचे पीठ नाही, तर निरोगी राहण्यासाठी ‘या’ पौष्टिक पिठांचा आहारात समावेश हवाच, वाचा सविस्तर
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 2017 च्या प्रभाग रचनेत जुजबी बदल?