ICICI, HDFC चा ठेवीदारांना दणका; व्याजदरात केली कपात

ICICI, HDFC चा ठेवीदारांना दणका; व्याजदरात केली कपात

RBI ने रेपो दराबाबत मोठी घोषणा करत कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यानंतर इतर बँकांनाही रेपो दरात बदल करावे लागणार आहे. त्याचा फायदा कर्ज घेणाऱ्यांना होणार आहे. तर मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार असलेल्यांना या फटका बसणार आहे. रेपो दरातील बदलामुळे मुदत ठेवींवर कमी व्याज मिळणार आहे. देशातील ICICI आणि HDFC या बँकांनी त्यांच्या MCLR दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

ICICI आणि HDFC बँकांनीने त्यांच्या MCLR दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. खाजगी क्षेत्रातील HDFC बँकेने त्यांचे कर्ज दर MCLR मध्ये 10 बेसिस पॉइंटने कपात केली आहे. आता 3 वर्षांच्या कालावधीसाठी 8.90% ते 9.10% यादरम्यान आहे. आयसीआयसीआय बँकेने 3 कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवर व्याजदर 10 ते 35 बेसिस पॉइंट्सने कमी केले आहेत. त्यामुळे मुदत ठेवींवर आता कमी व्याज मिळणार आहे.

आयसीआयसीआय बँक आता 271 दिवस ते 1 वर्ष कालावधीच्या ठेवींवर 5.75% व्याज देत आहे. जे पूर्वीपेक्षा 25 बेसिस पॉइंट्सने कमी आहे. 18 महिने ते 2 वर्ष कालावधीच्या ठेवींवरील व्याजदर 35 बेसिस पॉइंट्सने कमी होऊन तो 6.50% झाला आहे. 5 वर्षे ते 10 वर्ष कालावधीच्या ठेवींवरील व्याजदर 10 बेसिस पॉइंट्सने कमी होऊन 6.60०% झाला आहे. याशिवाय एफडीचा व्याजदर 15 बेसिस पॉइंट्सने कमी झाला आहे, जो आता 6.60 टक्के आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;