Omlette Making Tips- ऑम्लेट फ्लफी आणि साॅफ्ट होण्यासाठी या आहेत सर्वात बेस्ट टिप्स

Omlette Making Tips- ऑम्लेट फ्लफी आणि साॅफ्ट होण्यासाठी या आहेत सर्वात बेस्ट टिप्स

सकाळी ब्रेडसोबत ऑम्लेट खायला जवळजवळ सर्वांनाच आवडते. बऱ्याच लोकांना सकाळी ऑफिसला जाण्यासाठी जास्त वेळ नसतो, म्हणून ते पटकन ऑम्लेट बनवतात आणि नाश्ता करतात आणि नंतर ऑफिसला निघून जातात. अनेक घरांमध्ये अशी मुले असतात ज्यांना सकाळी नाश्त्यात ऑम्लेट खायला आवडते. परंतु ऑम्लेट फ्लफी होण्यासाठी काही छोट्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात.

फ्लफी ऑम्लेट बनवण्यासाठी, प्रथम सर्व साहित्य गोळा करा. यानंतर, अंडी फोडा आणि पिवळा भाग आणि पांढरा भाग वेगवेगळ्या भांड्यात ठेवा.

अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये एक चमचा साखर घाला आणि ते चांगले मिसळा. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ते मिसळा, हे मिश्रण मिसळल्यानंतर व्यवस्थित बाजूला काही काळ ठेवून द्यावे.

ऑम्लेट फ्लफी होण्यासाठी अर्धी वाटी पाणी घेऊन त्यात अंडे फेटा. एका अंड्यापासून तयार केलेले ऑम्लेट तिप्पट फुलेल.

घरी तुम्ही एकट्यासाठी फ्लफी आॅम्लेट करणार असाल तर, आधी सर्व साहित्य एकत्र करुन घ्या.

पांढरा आणि पिवळा भाग वेगवेगळ्या भांड्यात फेटा, पांढऱ्या भागासाठी मोठे भांडे.

पिवळ्या रंगाचा भाग फेटून त्यात , मसाला कांदा, मिरची, कोथिंबीर घालावी पुन्हा चांगले फेटून घ्यावे.

अंड्यातील पिवळा बलक मिश्रण पांढऱ्या भागामध्ये टाकावे आणि शेवटी एकदा हे दोन्ही मिश्रण पॅनवर टाकून फ्लफी ऑम्लेट तयार करावे.

बेस घट्ट झाल्यावर कोणतेही फिलिंग्ज/टॉपिंग्ज घाला. किसलेले चीज, कापलेले मशरूम इ.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;