सात जन्माचे नाते… पतीची हत्या केल्यानंतर सोनमने त्याच्या सोशल मीडियावर टाकली पोस्ट

सात जन्माचे नाते… पतीची हत्या केल्यानंतर सोनमने त्याच्या सोशल मीडियावर टाकली पोस्ट

मेघालयमधील शिलाँग येथे हनीमूनसाठी गेलेल्या राजा सुर्यवंशी याची त्याची पत्नी सोनमने हत्या घडवून आणल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण देश हादरला. लग्नाच्या अवघ्या बारा दिवसानंतर सोनमने तिच्या पतीची बॉयफ्रेंडसोबत मिळून राजा सुर्यवंशीची हत्या केली. आपल्या पतीची डोळ्या देखत हत्या झाल्यानंतर सोनमने त्याच्याच फोनवरून सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो शेअर करत त्या सोबत ‘सात जन्माचे नाते’, अशी पोस्ट शेअर केली होती. पोलीस तपासात आता नवनव्या गोष्टी समोर येत आहेत.

सोनमने राजासमोरच सांगितले की मारून टाका याला

हत्येच्या दिवशी सोनम राजाला घेऊन फोटोशूटच्या बहाण्याने शिलाँगच्या जंगल भागात गेली होती. तिथे चालून दमलेय असे दाखवत ती राजाच्या मागे मागेच चालत होती. दरम्यान ज्यावेळी तिघे मारेकरी राजाच्या आजूबाजूला आले तेव्हा ती राजासमोरच जोरात ओरडली की मारून टाका त्याला. त्यानंतर आरोपींनी राजावर कुऱ्हाडीने वार करत त्याची हत्या केली.

सोनमने घेतले ड्रग्ज

राजाची हत्या केल्यानंतर आपल्याला ड्रग्ज देऊन पळवून नेले असा खोटा कांगावा करण्यासाठी सोनमने स्वत: ड्रग्ज घेतल्याचे समोर आले आहे. सोनम जेव्हा गाझीपूरमध्ये सापडली तेव्हा ती ड्रग्जच्या नशेत होती, असे तेथील पोलिसांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;