अनावश्यक बोलू नका, नरेंद्र मोदींनी 11 वर्षांत केलेल्या कामाचा हिशेब द्यावा – हर्षवर्धन सपकाळ

अनावश्यक बोलू नका, नरेंद्र मोदींनी 11 वर्षांत केलेल्या कामाचा हिशेब द्यावा – हर्षवर्धन सपकाळ

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 11 वर्षात केलेल्या कामाचा हिशेब देशासमोर दाखवावा. त्यांनी अनावश्यक बोलू नये आणि वस्तुस्थितींबद्दल बोलावे”, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचं एक वर्ष आज पूर्ण होत आहे. सलग 11 वर्षे मोदी पंतप्रधान आहेत. मात्र, या काळात पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीपासून ते नेहमीच दूर राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना हर्षवर्धन सपकाळ असं म्हणाले आहेत.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “2014 मध्ये मानव विकास निर्देशांक काय होता आणि आता तो काय आहे? त्यावेळी जीडीपी वाढीचा दर किती होता? आज तो किती आहे? जर त्यांनी या सर्व गोष्टी सांगितल्या तर आवाज उठवण्यात काही अर्थ असेल. अन्यथा, ते अपयशांनी भरलेले आहे. नरेंद्र मोदी यांचा हा कार्यकाळ देशाला मागे घेऊन जाईल.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;