अमेरिकेकडून हिंदुस्थानीला अपमानास्पद वागणूक, केंद्र सरकारची बघ्याची भूमिका

अमेरिकेकडून हिंदुस्थानीला अपमानास्पद वागणूक, केंद्र सरकारची बघ्याची भूमिका

मनमानी कारभार, नोकऱ्यांत केलेली कपात, बंद करण्यात आलेले विविध सरकारी विभाग आणि मानवी हक्कांचे उल्लंघन अशा अनेक मुद्द्यांवरून अमेरिकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रम्प सरकारच्या या धोरणाविरुद्ध लोक रस्त्यावर उतरले आहेत. लॉस एंजेलिसमधील हिंसक निदर्शनांनी अमेरिकेत तणावाचे वातावरण आहे. त्यानंतरही अमेरिकन प्रशासन आपल्या कृती थांबवत नाहीये. आता अमेरिकेतील नेवार्क विमानतळावर एका हिंदुस्थानी विद्यार्थ्याला अमानुष वागणूक देण्यात आलीये. यासंदर्भातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

हिंदुस्थानी वंशाचे अमेरिकन उद्योगपती कुणाल जैन यांनी रविवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी एका हिंदुस्थानी विद्यार्थ्याला झालेल्या अमानुष वागणुकीबद्दल भाष्य केले आहे. मी नेवार्क विमानतळावर एका हिंदुस्थानी विद्यार्थ्याच्या हातात बेड्या घातलेल्या, आणि जमिनीवर आडव्या पडलेल्या अवस्थेत पाहिले. यावेळी तो खूप रडत होता. अमेरिकन अधिकारी त्याला गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देत होते. यावेळी तो स्वत: सिद्ध करण्यासाठी वारंवार मी वेडा नाही, मी वेडा नाही असं म्हणत होता. मात्र ते अधिकारी त्याला त्याला जबरदस्तीने वेडा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. ते दृश्य अत्यंत भयंकर होते असे ते म्हणाले.

दरम्यान, कुणाल जैन यांनी हिंदुस्थानी दूतावास, अमेरिका आणि हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.या विद्यार्थ्यासोबत नेमक काय होत आहे? आणि ते का होत आहे ते कोणीतरी शोधून काढावे. असे प्रकार दररोज समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून असे प्रकार सातत्याने वाढत आहेत, असे म्हणत त्यांनी अमेरिकेतील भयंकर परिस्थिती सगळ्यांसमोर आणली.

सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका दिवसानंतर, नेवार्कमधील हिंदुस्थानी दूतावासाने या घटनेवर भाष्य केले. यासंदर्भात त्यांना सोशल मीडियावर अनेक पोस्ट आढळल्या आहेत. ज्यात नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका हिंदुस्थानी नागरिकाला अमाणुष वागणूक दिली जात आहे. त्यामुळे हे प्रकरण नक्की काय आहे, बे पाहण्यासाठी आम्ही या संदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. असे त्यांनी स्पष्ट केले.

हिंदुस्थानी वंशाच्या व्यावसायिकाने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताच लोकांचा संताप उफाळून आला. अनेकांनी सांगितले की, सर्वत्र परिस्थिती जवळजवळ सारखीच आहे. अधिकारी कोणाचेही ऐकत नाहीत आणि नागरिकांसोबत असेच गैरवर्तन करतात. यामुळे आता अमेरिकेत असलेले हिंदुस्थानींना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

लॉस एंजेलिसमधील परिस्थिती चिघळली, हिंसाचाराला न जुमानता ट्रम्पने मरिनही केले तैनात

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फाशीचे रील बनवताना बसला फास फाशीचे रील बनवताना बसला फास
  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विशेषतः फेसबुक, इन्स्टाग्रामवर ‘रील’चे शॉर्ट व्हिडीओ केले जातात. अनेकजण त्यांच्या आवडीचे व्हिडीओ शेअर करतात. रील बनविण्याच्या
महामार्गालगत स्वच्छतागृहाअभावी प्रवाशांची कुचंबणा; हायकोर्टाची केंद्र, राज्य सरकारला नोटीस
नारायण राणे नावाच्या गुंडाविरुद्ध लढायला तयार, प्रकाश महाजन यांनी दंड थोपटले
मेट्रो प्रवासात शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलत द्या! युवासेनेची एमएमआरडीएकडे मागणी
वाट चुकलेली माहीममधील चिमुकली धारावीत सापडली, पोलिसांच्या झटपट शोधामुळे आईच्या कुशीत विसावली
हिंदुस्थानची लोकसंख्या 1.46 अब्जावर जाणार
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 227 वॉर्ड कायम