Jackfruit Recipe – फणसाचे रसाळ गरे खाऊन बिया फेकू नका, करा मस्त चमचमीत आरोग्यवर्धक आठळ्यांची भाजी

Jackfruit Recipe – फणसाचे रसाळ गरे खाऊन बिया फेकू नका, करा मस्त चमचमीत आरोग्यवर्धक आठळ्यांची भाजी

वटपौर्णिमेच्या सणानिमित्त घरोघरी फणस आणला जातो. परंतु फणस हा फार काळ टिकत नसल्यामुळे, तो खाऊन लगेच संपवावा लागतो. अशावेळी फणसाच्या बियांची भाजी करणे हा एक उत्तम पर्याय आहे. फणसाच्या बिया या आपल्या आरोग्यासाठी फार उपयुक्त मानल्या जातात. फणसाच्या बिया या चुलीवरील निखाऱ्यांमध्ये किंवा तव्यावर भाजूनही खाता येतात. याव्यतिरिक्त फणसाच्या बिया उकडूनही खाता येतात. फणसाच्या उकडलेल्या बिया या आरोग्यासाठी फारच गरजेच्या आहेत. फणसाच्या बिया लवकर खराब होऊ नये म्हणून गावच्या ठिकाणी या बियांना मातीमध्ये लिंपूनही ठेवल्या जातात. जेणेकरून वर्षभर फणसाच्या बिया टिकतील. फणसाच्या बियांना आठळ्या असे म्हणतात.

फणसाच्या उकडलेल्या बियांची भाजी करण्याची कृती

प्रथम फणसाच्या बिया स्वच्छ धुवून घ्याव्यात. या धुतलेल्या बिया उकडून घ्याव्यात. उकडताना पाण्यामध्ये मीठ टाकावे. म्हणजे या बियांमध्ये मीठ चांगल्या प्रकारे मुरेल.

उकडलेल्या बिया थंड झाल्यावर, त्या व्यवस्थित सोलून घ्याव्यात. सोललेल्या बियांना मधून चिर मारुन दोन भाग करावेत.

एका पॅन मधे तेल गरम करुन, त्यात कडीपत्ता, मोहरी जिरे फोडणीला द्यावे. त्यानंतर त्यामध्ये कांदा मिरची टाकावी. हे व्यवस्थित गुलाबी रंगावर परतून घ्यावे. परतल्यानंतर यामध्ये फणसाच्या उकडलेल्या बिया परतुन घ्याव्यात. नंतर वरुन कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. ही भाजी चपातीसोबत अतिशय उत्तम लागते.

फणसाच्या बिया खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

फणसाच्या बियांमध्ये मुख्यत्वे फायबरचे प्रमाण खूप असते. यामुळे आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फणसाच्या बिया या महत्त्वाची भूमिका बजावतात.

फणसाच्या बिया आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी, खूप उत्तम मानल्या जातात.

लोह आणि व्हिटॅमिन बी चा उत्तम स्त्रोत असल्यामुळे, फणसाच्या बिया खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी फणसाच्या बिया फार उपयुक्त आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘क्या हुआ तेरा वादा’? शिवसेनेच्या चक्काजाम आंदोलनाने छत्रपती संभाजीनगर दणाणले, महावीर चौकात तासभर वाहतूक ठप्प ‘क्या हुआ तेरा वादा’? शिवसेनेच्या चक्काजाम आंदोलनाने छत्रपती संभाजीनगर दणाणले, महावीर चौकात तासभर वाहतूक ठप्प
विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची सत्ता मिळताच पूर्तता न करता जनतेला वार्‍यावर सोडणार्‍या महायुतीला क्या हुआ तेरा वादा? असा खणखणीत सवाल...
14 तास नाॅनस्टाॅप कर्करोगाची शस्त्रक्रिया, दीपिका कक्करची भावूक पोस्ट
‘चल हल्ला बोल’ नामदेव ढसाळांवरील चित्रपट फक्त प्रौढांसाठी! सेन्साॅर बोर्डाचा अजब निर्णय
No emotion, no love , no f××k! दोन दिवसांपूर्वी पोस्ट केली अन् लाखो फॉलोअर्स असलेल्या इन्फ्लुयन्सरचा आज मृतदेह आढळला
…तर न्यायव्यवस्था हस्तक्षेप करणारच, मात्र अतिरेक टाळावा! सरन्यायाधीश भूषण गवई यांचे परखड मत
लग्नाच्या तीन वर्षांनंतर आलिया भट्टने का बदलले नाव?
ट्रम्प हिंदुस्थानचा अपमान करत असताना मोदी गप्प आहेत, हे कमजोर पंतप्रधान असल्याचे लक्षण – संजय राऊत