देशात आढळले कोरोनाचे 358 रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजारच्या वर

देशात आढळले कोरोनाचे 358 रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजारच्या वर

गेल्या 24 तासांत देशात 358 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 491 झाली आहे. असे असले तरी गेल्या 24 तासांत एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

गेल्या 24 तासांत सर्वाधिक रुग्ण हे गुजरातमध्ये सापडले आहे. गुजरातमध्ये 158 रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये सर्वाधिक 1 हजार 957 सक्रिय रुग्ण आहेत. दुसरीकडे दिल्लीत गेल्या 24 तासांत 42 रुग्ण आढळले आहेत. सोमवारी 378 रुग्ण आढळल्यानंतर एकूण रुग्णांची संख्या सहा हजारांच्या वर गेली आहे. तसेच सोमवारी सहा जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या 24 तासांत 624 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;