Monsoon Skin Care- पावसाळ्यात चेहऱ्यावर हे 2 घरगुती मास्क लावा, कांती नितळ चकचकीत होईल!

Monsoon Skin Care- पावसाळ्यात चेहऱ्यावर हे 2 घरगुती मास्क लावा, कांती नितळ चकचकीत होईल!

पावसाळ्यात आपल्याला अनेकदा चेहऱ्यावर मुरुम किंवा पिगमेंटेशनमुळेही डाग येतात. हे डाग चेहऱ्याचे सौंदर्य कमी करतात. यामुळे चेहरा खूप निस्तेज दिसू लागतो. अशावेळी डाग दूर करण्यासाठी, आपण काही घरगुती उपाय करु शकतो. या घरगुती उपचारांमध्ये दही देखील समाविष्ट आहे. पावसाळ्यामध्ये त्वचेसाठी दही लावणे हे खूप फायदेशीर आहे. त्यात लॅक्टिक अॅसिड असते, यामुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत मिळते. याशिवाय दह्यामुळे त्वचेचा रंग सुधारण्यास देखील मदत मिळते. दही त्वचेवरील टॅनिंग, पिंपल्स, पिगमेंटेशन आणि सुरकुत्या या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करू शकते. चेहऱ्यावर नियमितपणे दही लावल्याने त्वचा मऊ आणि चमकदार होते.

 

 

दही आणि बेसन

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी, बेसन दह्यात मिसळून लावू शकता. बेसन त्वचेवरील घाण आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते. त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी ते प्रभावी आहे. यासाठी एका भांड्यात 2 चमचे बेसन घ्या. त्यात 2 चमचे दही घाला आणि चांगले मिसळा. आता ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. सुमारे  10-15 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावावे.

 

दही आणि लिंबू

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी दह्यात लिंबू मिसळून लावू शकता. लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असते. यामुळे डाग आणि टॅनिंग कमी होण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेचा रंग सुधारतो. यासाठी एका भांड्यात 2 चमचे दही घ्यावे. त्यात एक चमचा लिंबाचा रस घालावा चांगले मिक्स करुन घ्यावे. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. आठवड्यातून 2-3 वेळा वापरल्याने हळूहळू सर्व डाग निघून जातील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;