अजित पवार गट, मिंधे गट हे फक्त बुडबुडे, ते लवकरच फुटतील; संजय राऊत यांचा घणाघात

अजित पवार गट, मिंधे गट हे फक्त बुडबुडे, ते लवकरच फुटतील; संजय राऊत यांचा घणाघात

अजित पवार गट, मिंधे गट हे फक्त बुडबुडे आहेत. हे बुडबुडे लवकरच फुटतील. तसेच मोदी, शहा यांच्या भअरमाचे भओपळे रोज फुटत आहेत. तसेच आपण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत आहोत, असा काही जणांचा भ्रम आहे. मात्र, महाराष्ट्रद्रोह्यांचे बूट चाटणे, हे बाळासाहेबांचे विचार नाहीत, असे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंध्यांना चांगलेच फटकारले.

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मिंधे यांनी कधी आत्मसात केले? ते कोणत्या काळात बाळासाहेबांसोबत होते? काहीजण स्वतःबाबत गैरसमज बाळागतात. त्यातील तो एक भ्रम आहे. महाराष्ट्राच्या मुळावर आलेल्या मोदी, शहा, फडणवीस यांचे बूट चाटणे हा बाळासाहेबांचा विचार कधीही असून शकत नाही. महाराष्ट्र, मुंबईची लूट सुरू असताना मराठी माणसाची गळचेपी होत असताना ते महाराष्ट्रद्रोह्यांचे बूट चाटत असतील, तर त्यावर काही बोलण्याची गरज नाही, असे संजय राऊत म्हणाले.

सध्या ईडी, सीबीआय आणि तपास यंत्रणा यांच्या हातात सर्व सूत्रे आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लिहिलेल्या लेखामुळे फडणवीसांपासून मोदीपर्यंत सर्वांना मिरच्या झोंबल्या आहेत. तपास यंत्रणाचा कसा गैरवापर होत आहे, ते त्यांनी मांडले आहे. पक्ष फोडून, आमदार, खासदार विकत घेत, तपास यंत्रणांचा गैरवापर, पैशांचा गैरवापर करत त्यांनी निवडणुका जिंकल्या आहेत. अजित पवार यांचा गट, मिंधे यांचा गट हे बुडबुडे आहेत. हे बुडबुडे लवकरच फुटतील. तसेच मोदी आणि शहा यांच्या भ्रमाचा भोपळा रोज फुटत आहे. मात्र, आम्ही या परिस्थितीवर मात करत पुन्हा उभे राहू हा विश्वास आम्हांला आहे, असेही ते म्हणाले.

काही माणसं पक्की असतात, तर काही कच्ची मडकी असतात. पक्क्या माणसांपैकी नाशिकमधील विलास शिंदे आहेत. तर चंद्रहार पाटील यांच्यासारखी काही कच्ची मडकी आहेत. त्यांच्यासाठी आम्ही प्रतिष्ठेचा विषय केला. त्यांच्यासाठी आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली. मात्र, स्वार्थासाठी, लाभासाठी बेईमानी करावी, त्याला आम्ही काय कमी दिले. त्यांच्या विट्यात त्यांना मतं मिळाली नाही. ज्या माणसासाठी आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली, त्यांनी बेईमानी करावी, याचे वाईट वाटते, असे संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;