वेस्ट इंडिजच्या विस्फोटक फलंदाजाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, वयाच्या 29 व्या वर्षीच कारकीर्द संपुष्टात

वेस्ट इंडिजच्या विस्फोटक फलंदाजाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, वयाच्या 29 व्या वर्षीच कारकीर्द संपुष्टात

ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल, दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन यांनी काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. दोघेही विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जात होते. या दोघांच्या पाठोपाठ आता वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज निकोलस पुरन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी निवृत्ती घेतल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले.

निकोलस पूरनने इन्स्टाग्रामर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना निवृत्तीबद्दल माहिती दिली. खूप विचार केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे त्याने म्हटलं आहे. त्याचबरोबर क्रिकेटने मला खूप काही दिलं आहे. वेस्ट इंडिजच प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली, राष्ट्रगीतासाठी उभं राहणं असो आणि मैदानात उतरून सर्वस्व झोकून देऊन खेळणं असो. या सर्व गोष्टी शब्दांत व्यक्त करण कठीण आहे. संघाचा कर्णधार होणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती, जे मी कायम माझ्या हृदयात जपून ठेवेण, अस निकोलसने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर त्याने सर्व चाहत्यांचे, सहकाऱ्यांचे आभार मानले असून वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी माझं प्रेम कधीच संपणार नसल्याचे तो म्हणाला आहे.

निकोलस पुरनने 2016 साली पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पन केलं होत. पूरनने आपल्या कारकिर्दीमध्ये 61 वनडे सामन्यांमध्ये 1983 धावा आणि 106 टी-20 सामन्यांमध्ये 2275 धावा केल्या आहेत. निकोलस पूरन आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक सामने खेळणारा आणि सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निकोलस निवृत्त झाला असला तरी, फ्रेंचायजी क्रिकेटमध्ये त्याचा बेधडक अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

नवे आहेत; पण छावे आहेत, करंदीकर व्याख्यानमालेत दिलीप वेंगसरकर यांची बोलंदाजी

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;