घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास, 16 तासांत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास, 16 तासांत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

कणकवली शहरातील कनगरनगर येथील समृद्धी कोरगावकर यांच्या घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयितच्या मुसक्या आवळण्यात एलसीबी व कणकवली पोलिसांना यश आले. हा गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 16तासांत संशयित आरोपीला पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले.

शहरातील कनकनगर येथील परिचारिका समृद्धी मिलिंद कोरगावकर या शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात 7 जून रोजी नाईट ड्युटीसाठी गेल्या होत्या. तर त्यांचे पती मिलिंद हे आपल्यावडील आणि मुलासोबत आपल्या मालवण येथील बहिणीकडे गेले होते. रविवारी 8 जून रोजी सकाळी नऊ वाजता ड्युटीवरून आल्यानंतर समृद्धी यांना आपल्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी झालेली दिसली. चोरट्याने साडेतीन लाखांचा ऐवज चोरल्याची फिर्याद समृद्धी कोरगावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

दरम्यान याच चोरीचा छडा लावण्यासाठी एलसीबी आणि कणकवली पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक चोरट्याच्या मागावर होते. मानवी कौशल्य आणि पणजी शहरात पायी गस्त घालून एलसीबी आणि पोलिसांनी अवघ्या 16 तासांत संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. चोरलेल्या मोबाईलच्या लोकेशनद्वारे पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. संतोष वसंत सुतार (48, रा. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दागिने हस्तगत केले आहेत. दरम्यान, मंगळवारी त्याला येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे.

कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, डीवायएसपी घनःश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या सुचनेनुसार कणकवली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, एलसीबी पीएसआय रामचंद्र शेळके, समीर भोसले, हवालदार पांडुरंग पांढरे, हवालदार डॉमनिक डिसोझा, हवालदार जॅक्सन घोंसालवीस, हवालदार आशिष जामदार यांच्या पथकाने केली. तपास अनिल हाडळ करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;