एबी डिव्हिलियर्सने सांगितलं जगातील सर्वात खतरनाक फलंदाजाचं नाव, कोण आहे तो?

एबी डिव्हिलियर्सने सांगितलं जगातील सर्वात खतरनाक फलंदाजाचं नाव, कोण आहे तो?

जगातील आक्रमक फलंदाजांच्या यादीत समावेश असणारा आणि मिस्टर 360 म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने जगातील सर्वात धोकादायक फलंदाजाचं नाव सांगितलं आहे. विशेष म्हणजे आपल्या विस्फोटक खेळीने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या ख्रिस गेल, विरेंद्र सेहवाग आणि सनथ जयसूर्या यांचा यामध्ये समावेश नाही. एबी डिव्हिलियर्सने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगला आपल्या काळातील सर्वात खतरनाक फलंदाज मानलं आहे.

एका मुलाखतीमध्ये एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, “मला वाटतंय की रिकी पॉण्टिंगविरुद्ध खेळणं खूप आव्हानात्मक होतं. मला नेहमी वाटायचं की तो जगातील सर्वात धोकादायक फलंदाज आहे. त्याची फलंदाजी जबरदस्त होती. त्याचं फलंदाजीवर कायम नियंत्रण होतं. तो संघाला विजय मिळवून देत होता. गोलंदावर तुटून पडण्यात तो उजवा होता. जेव्हा तो फलंदाजी करायचा तेव्हा, तो खेळ सोपा करत असे, असं म्हणत एबी डिव्हिलियर्सने पॉण्टिंगला आपल्या काळातील खतरनाक फलंदाज मानलं आहे.

रोहित नव्हे श्रेयस कर्णधार? हिंदुस्थानी वन डे संघाच्या नव्या नेतृत्वाची चर्चा सुरू

ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि खेळाडू म्हणून रिकी पॉण्टिंगच्या नावाच उल्लेख केला जातो. त्याने 168 कसोटी सामन्यांमध्ये 13 हजार 378 धावा केल्या असून यामध्ये 41 शतके आणि 62 अर्धशतकांचा समावेस आहे. तसेच 375 वनडे सामन्यांमध्ये 13 हजार 704 धावा केल्या असून त्यामध्ये 30 शतके आणि 82 अर्धशतकांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;