3 गुप्तचर विमानांसाठी मोजणार 10 हजार कोटी; आय-स्टार विमानाचा प्रस्ताव तयार, लवकरच मंजुरीसाठी मांडणार
पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर हिंदुस्थानने आता संरक्षण दलांवर अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. हिंदुस्थानी हवाई दलासाठी तीन आधुनिक आय-स्टार गुप्तचर विमाने खरेदी करण्याची तयारी सरकारने चालवली आहे. हे विमाने गुप्तचर, पाळत ठेवणे, लक्ष्य अधिग्रहण आणि शोध लावण्यासारखे काम करतेय. या तीन गुप्तचर विमानासाठी तब्बल 10 हजार कोटी रुपये मोजले जाणार आहेत. यासाठी संरक्षण मंत्रालय जूनच्या चौथ्या आठवड्यात होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत मंजुरीसाठी आपला प्रस्ताव ठेवणार आहे.
ही गुप्तचर विमाने मिळाल्यानंतर भारताचा अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायलसारख्या निवडक देशांमध्ये समावेश होईल. गुप्तचर विमाने या देशांकडे आधीच आहेत. आधुनिक आय-स्टार गुप्तचर विमान डीआरडीओच्या सेंटर फॉर एअरबोर्न सिस्टीम्सने विकसित केलेल्या स्वदेशी प्रणालींनी सुसज्ज असेल. त्यांची यशस्वी चाचणी आधीच घेण्यात आली आहे. हे विमान दिवस आणि रात्री कोणत्याही हवामानात काम करण्यात तरबेज आहेत. हे विमान हिंदुस्थानी हवाई दलाच्या ताफ्यात आल्यानंतर शत्रूच्या हालचालींवर दूरवरून लक्ष ठेवण्यास मदत होईल.
31 तेजस लढाऊ विमाने
हिंदुस्थानकडे सध्या 31 तेजस लढाऊ विमाने आहेत. तेजस लढाऊ विमाने हे सुखोई, राफेल, मिराज आणि मिगपेक्षा हलके आहे. हवाई दलाने जम्मू आणि कश्मीरमधील अवंतीपोरा हवाई तळावर हलके लढाऊ विमान तेजस एमके-1 तैनात केले, तर एप्रिल 2024 मध्ये, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने 5 व्या पिढीतील स्वदेशी लढाऊ विमानाच्या डिझाइन आणि विकासासाठी 15,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List